मिश्र डाळींची इडली | Mix Split Lentil Idli Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix Split Lentil Idli recipe in Marathi,मिश्र डाळींची इडली, Sujata Hande-Parab
मिश्र डाळींची इडलीby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    8

    1 /4तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

मिश्र डाळींची इडली recipe

मिश्र डाळींची इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Split Lentil Idli Recipe in Marathi )

  • मिश्र डाळी - 1 कप (रात्रभर भिजवून घेतलेले)
  • इडली तांदूळ –१/४ कप टेबलस्पून. (रात्रभर भिजलेले)
  • हिरवी पेस्ट - बारीक चिरून कोथिंबीर - १/४ कप
  • लसूण पाकळ्या - २
  • धणेपूड - १/२ टिस्पून
  • पाणी - १-२ कप रात्रभर भिजवण्यासाठी + ३/४ -१ कप 
  • इनो - १ पॅकेट
  • तेल - २ टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ. 

मिश्र डाळींची इडली | How to make Mix Split Lentil Idli Recipe in Marathi

  1. एका ब्लेंडर किंवा मिक्सरला कोथिंबीर, लसूण पाकळ्या बारीक वाटून घ्या.
  2. तांदूळ आणि मिश्र डाळी रात्रभर पाण्यात भिजवून घ्या.
  3. दुसऱ्या दिवशी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. मीठ, तयार हिरवी पेस्ट, कोथिंबीर पावडर घालावी.
  4. आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि मिश्रण बनवून घ्यावे. जास्त पातळ किंवा जाड नसावे. इडली पात्रात पाणी घालून ते गरम करून घ्यावे. साच्यांना तेल लावून घ्यावे.
  5. बनवलेल्या मिश्रणामध्ये एक इनो चे पॅकेट कापून इनो अलगद मिक्स करून घ्यावा. जास्त ढवळू नये.
  6. तेल लावलेल्या साच्यात मिश्रण अलगद भरून घ्यावे आणि इडली पात्रात १०-१२ मिनिटे मध्यम कमी आचेवर वाफवून घावे.
  7. टूथ पीक घालून इडलीज झाल्या आहेत कि नाही ते चेक करावे.
  8. बाहेर कडून थोड्या थंड होऊ द्याव्यात.
  9. गरमा गरम सांबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.

Reviews for Mix Split Lentil Idli Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo