कुरकुरीत भेंडी | Krispy Bhendi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Krispy Bhendi recipe in Marathi,कुरकुरीत भेंडी, priya Asawa
कुरकुरीत भेंडीby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

कुरकुरीत भेंडी recipe

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Krispy Bhendi Recipe in Marathi )

  • 2 कप भेंडी धुवून कोरडी करून लांब बारीक कापलेली
  • बेसन पिठ 4 चमचे
  • तांदळाचे पिठ 3 चमचे
  • लाल तिखट 1 चमचा
  • हळद पाव चमचा
  • चाट मसाला 1 चमचा
  • जिरे पावडर 1 चमचा
  • लिंबाचा रस 1 चमचा
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार

कुरकुरीत भेंडी | How to make Krispy Bhendi Recipe in Marathi

  1. प्रथम एका बाऊल मध्ये बेसन पिठ, तांदळाचे पिठ, लाल तिखट, हळद, जीरे पावडर घेऊन मिक्स करून घ्या
  2. एका ताटात भेंडी पातळ पसरुन घ्या
  3. तयार केलेले मसाला व लिंबाचा रस भेंडी वर टाकुन हाताने सगळ्या भेंडी ला व्यवस्थित लावुन घ्या
  4. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा
  5. भेंडी थोडी एका प्लेट मध्ये घ्या व चवीनुसार मीठ घालून व भेंडी लावून कुरकुरीत तळून घ्या
  6. या प्रकारे सगळी भेंडी तळून घ्या
  7. तयार कुरकुरीत भेंडी वर चाट मसाला टाकून व्यवस्थित लावुन घ्या
  8. आपली कुरकुरीत भेंडी तयार
  9. याला तयार पोळी बरोबर द्या

My Tip:

जेव्हा भेंडी तळण्यासाठी घ्यायला तेव्हाच मीठ घालावा नाहीतर भेंडी ला पाणी सुटेल व भेंडी कुरकुरीत होणार

Reviews for Krispy Bhendi Recipe in Marathi (0)