मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड़आलेले मेथिदाणे झुणका आणि रुमाली रोटी

Photo of Sprauted Methidane Jhunka nd Rumaliroti by Vaishali Joshi at BetterButter
641
5
0.0(0)
0

मोड़आलेले मेथिदाणे झुणका आणि रुमाली रोटी

Jul-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड़आलेले मेथिदाणे झुणका आणि रुमाली रोटी कृती बद्दल

हा एक वेगळ्या टेस्टचा पौष्टिक झुनका आहेच , हा पोळी , भाकरी , पराठा कशाही सोबत खुप चवदार लागतो .विशेष म्हणजे मोड़ आल्या मुळे बिलकूल कडवटपणा जाणवत नाही , डायबेटिक पेशंट्स साठी उपयुक्क्त. मी याला रुमाली रोटी सोबत सर्व्ह केलय .ही पोळी मी कढई चा वापर करुन केलि

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड़ आलेले मेथी दाणे १वाटी
  2. चिरलेला कांदा १
  3. चिरलेला टोमेटो १
  4. चिरलेल्या हिरव्या मिरच्या २
  5. ठेचलेला लसूण ७-८ पाकळ्य़ा
  6. १/२ लिंबू चा रस
  7. तेल
  8. मोहोरी
  9. तिखट
  10. हळद
  11. मीठ
  12. कोथिंबीर
  13. रुमाली रोटी साठी -

सूचना

  1. मेथी दाणे १२ तास भिजत घालून , फुगल्यावर कपडया ने कोरडे करुन मोड़ आणायला रात्रभर ठेवून द्या . सकाळी वापरायला तयार होइल .
  2. गैस वर कढईत तेल तापत ठेवा त्यात मोहोरी , मिरच्या , लसूण , कांदा टाकून परता .टोमेटो घाला , तिखट हळद घालून परता
  3. मोड़ आलेली मेथी घाला , पाण्याचा हबका मारा आणि एक वाफ येउ द्या , मीठ लिंबचा रस घाला बेसन पीठ घालून परतून घ्या .परत एक वाफ़ येउ द्या . खाली उतरवा कोथिंबीर घाला , की झुनका तयार
  4. रुमाली रोटी साठी -कणिक आणि मैदा मिक्स करुन तेल आणि मीठ टाका .दुधाने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवा
  5. भिजवलेल्या पिठाचे गोळे करुन मोठी आणि पात्त ळ पोळी लाटा .गैस वर कढई पालथी ठेवा
  6. गैस वर कढई पालथी ठेवा गरम झाली की पोळी हातावर घेवुन वर गोल गोल फिरवा आणि पालथ्या कढई वर टाका .दोन्ही बाजूने शिजवून घ्या
  7. बस तयार मेथी चा झुनका आणि रुमाली रोटी टिफिन मधे भरण्य़स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर