सूरण मलाई करी | Elephant foot malai curry Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Elephant foot malai curry recipe in Marathi,सूरण मलाई करी, seema Nadkarni
सूरण मलाई करीby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    50

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

सूरण मलाई करी recipe

सूरण मलाई करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Elephant foot malai curry Recipe in Marathi )

  • 250 ग्राम सूरण
  • 2-3 कांदा
  • 8-10 लसूण पाकळ्या
  • 1 तूकडा आले
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • 2 कप क्रिम
  • चवी पुरते मीठ
  • तेल
  • काळे मिरे पावडर 1-2 चमचा
  • कोथिंबीर
  • 2 चमचा दही किंवा आमचूर पावडर

सूरण मलाई करी | How to make Elephant foot malai curry Recipe in Marathi

  1. सौ प्रथम सूरण ला स्वच्छ धुवून घ्या. त्याचे मोठे तुकडे करून कूकर मध्ये ठेवून 1-2 शीट्या काढून घ्या.
  2. सूरणा च्या मोठ्या तूकडया चे लहान तूकडे करुन तेलात करकरीत तळून घ्या
  3. एका पेन मध्ये थोडे तेल घालून चीरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  4. त्यात लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या, हळद घालून एकत्र करावे
  5. कांद्याच्या मिश्रण ला थंड झाल्यावर मीक्सर मधून वाटून घ्यावे.
  6. पेन मध्ये थोडे तेल घालून जीरे, हिंग घालून घ्या. त्यात लाल सुकी मिरची, लवंग, दालचिनी घालून भाजून घ्या.
  7. कांद्याची पेस्ट घालून एकत्र करावे. आणि थोड्या वेळ झाकून ठेवावे.
  8. तेल सुटायला आले की त्यात मीठ आणि क्रिम घालून घ्या.
  9. काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे.
  10. त्यात सूरणा चे तूकडे एकत्र करून, एक उकळी आणावी.
  11. कोथिंबीर टाकून सर्व करावे.
  12. या भाजी बरोबर मी पराठे दिले होते डब्यात

My Tip:

सूरण ला स्वच्छ धुवून घ्या. त्यात खूप माती असते, 2-3 च शीट्या काढून घ्या जास्त शीट्या काढल्या तर ते गळून जातील...

Reviews for Elephant foot malai curry Recipe in Marathi (0)