मुख्यपृष्ठ / पाककृती / काबुली चणे

Photo of Kabuli chane by archana chaudhari at BetterButter
844
3
0.0(0)
0

काबुली चणे

Jul-21-2018
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काबुली चणे कृती बद्दल

सगळ्यांनाच आवडणारे काबुली चणे(छोले) डब्याला मिळाले तर क्या बात....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. काबुली चणे(छोले) २ कप
  2. कांदे २ मध्यम बारीक चिरलेले
  3. टोमॅटो २ मध्यम बारीक चिरलेले
  4. आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  5. तिखट १ टीस्पून
  6. हळद २ टीस्पून
  7. गरम मसाला १ टीस्पून
  8. धणे पावडर २ टीस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल २ टेबलस्पून

सूचना

  1. रात्री काबुली चणे(छोले) धुवून ४ पट पाणी टाकून भिजवून ठेवा.
  2. सकाळी भिजवलेले काबुली चणे आणि थोडे मीठ कुकर मध्ये ४ शिट्या देऊन शिजवून घ्या.
  3. आता कढईत तेल गरम करायला ठेवा.
  4. तेल तापल्यावर कांदा, हिरवी मिरची टाकून चांगले परतवून घ्या.
  5. आता टोमॅटो टाका.
  6. थोड्या वेळाने तिखट,हळद,गरम मसाला, धणे पावडर टाका.
  7. छान तेल सूटेपर्यंत परतवून घ्या.
  8. आता शिजवलेले काबुली चणे(छोले) टाका.
  9. मीठ घाला.
  10. 10 मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवा.
  11. गॅस बंद करून एका बाउल मध्ये काढून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर