हाका नुडल्स | Hakka noodles Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Hakka noodles recipe in Marathi,हाका नुडल्स, Teju Auti
हाका नुडल्सby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

हाका नुडल्स recipe

हाका नुडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Hakka noodles Recipe in Marathi )

  • २ नूडल्स केक्स (५० ग्राम प्रत्येकी)
  • १ टेस्पून तेल
  • १/२ टेस्पून सोया सॉस
  • ५ मोठ्या लसूण पाकळ्या
  • १/२ इंच आलं
  • १ टेस्पून मसाला चिली सॉस
  • १ टेस्पून टोमॅटो पेस्ट
  • चवीपुरते मिठ
  • १/२ टिस्पून व्हिनेगर
  • भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, पाती कांदा - पातळ उभे चिरून
  • २ ते ३ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून

हाका नुडल्स | How to make Hakka noodles Recipe in Marathi

  1. जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मिठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात.
  2. लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो पेस्ट एकत्र करून बारीक पेस्ट बनवून घ्यावी
  3. कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे
  4. भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे. पाती कांदा वरती सजवावा व गरमा गरम सर्व्ह करावे.

My Tip:

भाज्या सममसान घ्याव्या तसेच शिजलेल्या नूडल्सच्या १/३ प्रमाणात असाव्यात

Reviews for Hakka noodles Recipe in Marathi (0)