कोबी माँच्युरीयन | Manchurian Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Manchurian recipe in Marathi,कोबी माँच्युरीयन, Aarya Paradkar
कोबी माँच्युरीयनby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

कोबी माँच्युरीयन recipe

कोबी माँच्युरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Manchurian Recipe in Marathi )

  • 2-3 खिसलेले गाजर
  • पाव किलो खिसलेला कोबी
  • 2 बारीक चिरलेली सिमला मिरची
  • 2-3 चमचे बीटाचा रस
  • 5-6 खिसलेल्या लसूण पाकळ्या
  • 1 इंच खिसलेले आले
  • 2 बारीक चिरलेली मिरची
  • 1/2 वाटी मैदा
  • पाव वाटी कॉर्न फ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • ** माँच्युरीयन सॉस साहित्य **
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 बारीक चिरलेली सिमला मिरची
  • 2-3 चमचे बारीक चिरलेला लसूण
  • 1 1/2 चमचा खिसलेले आले
  • 2 चमचे बारीक चिरलेली मिरची
  • 3 चमचे सोया सॉस
  • 3 चमचे रेड चिली सॉस
  • 3 चमचे टोमॅटो सॉस
  • 2 चमचे कॉर्नफ्लॉवर
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • 1/2 चमचा साखर
  • पाणी

कोबी माँच्युरीयन | How to make Manchurian Recipe in Marathi

  1. प्रथम माँच्युरीयन चे साहित्य एकत्र करून चांगले मळून घेणे, पाणी अजिबात घालू नये
  2. तेल गरम करून
  3. वरील मिश्रणाचे भजी तळून घ्यावे
  4. माँच्युरीयन सॉस करण्यासाठी
  5. प्रथम तेल गरम करून त्यात कांदा ,सिमला मिरची घालून चांगले परतून घ्यावे
  6. त्यात आले लसूण मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात रेड चिली सॉस, सोया सॉस व टोमॅटो सॉस घालणे, 2 ग्लास पाणी घालून उकळणे
  8. काॅर्न फ्लोअर मधे थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून ती हळूहळू मिक्स करणे गुठळ्या होऊ देऊ नये
  9. चवीनुसार मीठ व साखर घालावी
  10. एक चांगली उकळी आणावी
  11. माँच्युरीयन बॉलवर माँच्युरीयन सॉस घालून सर्व्ह करावे

Reviews for Manchurian Recipe in Marathi (0)