ऑमलेट पराठा | Omlet Paratha Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Omlet Paratha recipe in Marathi,ऑमलेट पराठा, Vaishali Joshi
ऑमलेट पराठाby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

ऑमलेट पराठा recipe

ऑमलेट पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Omlet Paratha Recipe in Marathi )

  • कणिक २ कप
  • अंडी ४
  • दूध ३ टीस्पून
  • कांदे २ बारीक़ चिरून
  • टोमेटो २ बिया काढून चिरलेले
  • शिमला मिर्ची १
  • कोथींबिर
  • हिरव्या मिरच्या २
  • तिखट१ टीस्पून
  • हळद१/२ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • जीरे पावडर १ टीस्पून
  • मिरे पावडर १ टीस्पून
  • तेल

ऑमलेट पराठा | How to make Omlet Paratha Recipe in Marathi

  1. कणकेत मीठ आणि तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवा ५ मिनिट . गोळे करुन घ्या
  2. एक भांडयात सगळी अंडी फोडून घ्या त्यात दूध , कांदा , टोमेटो , शिमला मिर्ची , हिरव्या मिरच्या , कोथिंबिर , तिखट , हळद ,जीरे पावडर , मिरे पावडर , २ चमचे तेल , मीठ टाकून फेटून ठेवा
  3. आता कणकेचा गोळा घेउन पोळी लाटा आणि त्याला वरून तेल लावा त्यावर कणिक भुरभुरवा .त्याच्या चाकूने पट्टी कापून घ्या
  4. पहिली पट्टी रोल करा , टी दुसरया पट्टी वर रोल करा अशा एका वर एक रोल करून एक गोळा करा
  5. त्याची पोळी लाटा , गरम तव्या वर हा पराठा तेल सोडून चांगला क्रिस्पी करून बाजूला ठेवा
  6. तव्यावर तेल घालून ऑमलेट चे बैटर टाका गोल पसरवून घ्या त्यावर तयार केलेला पराठा टाका आणि व्यवसस्थीत आजुबाजुने तेल सोडून दाबुन दाबुन शिजवून घ्या
  7. बस तयार आहे हायप्रोटीन युक्त ऑमलेट पराठा

Reviews for Omlet Paratha Recipe in Marathi (0)