पालक व्हील | Palak wheel Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Palak wheel recipe in Marathi,पालक व्हील, Shilpa Deshmukh
पालक व्हीलby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

15

0

पालक व्हील recipe

पालक व्हील बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak wheel Recipe in Marathi )

  • मैदा 1 कप
  • कणिक 1/2 कप
  • पालक ब्लांच 1/2 कप
  • तिखट 1 tbs
  • अद्रक लसूण पेस्ट 2 tbs
  • मीठ
  • गरम मसाला 1 tbs
  • तळण्यासाठी तेल

पालक व्हील | How to make Palak wheel Recipe in Marathi

  1. मैदा आणि कणिक एकत्र करा
  2. मीठ आणि थोडं मोहन घालून मिक्स करा तिखट ,मीठ ,गरम मसाला ,अद्रक लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  3. पिठाचे दोन भाग करा
  4. एका भागात ब्लांच पालक घाला ,गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  5. दुसऱ्या पिठात पाणी घालून तेही पीठ मळून घ्या .दहा मिनिट झाकून ठेवा .
  6. आता पांढऱ्या पिठाची पोळी लाटा
  7. नंतर हिरव्या पिठाची पोळी लाटा
  8. पांढऱ्या पोळीवर हिरवी पोळी ठेवून रोल करा .पोळी जोडताना मध्ये थोडं पाणी लावा.
  9. थोडं प्रेस करत रोल करा
  10. आता सुरीने 2 सेमी इतके तुकडे कापून घ्या .
  11. कापलेल्या गोल चकतीवर हलकेच लाटणे फिरवा
  12. तेल गरम करा मध्यम आचेवर तळून घ्या
  13. लहान मुलांना टिफिनमध्ये काहीतरी आकर्षक दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात .

Reviews for Palak wheel Recipe in Marathi (0)