अंडा भुर्जी विद रोटी | Anda/ Egg Bhurji with Roti Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Anda/ Egg Bhurji with Roti recipe in Marathi,अंडा भुर्जी विद रोटी, Renu Chandratre
अंडा भुर्जी विद रोटीby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

अंडा भुर्जी विद रोटी recipe

अंडा भुर्जी विद रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Anda/ Egg Bhurji with Roti Recipe in Marathi )

  • अंडी 6
  • बारीक चिरलेला कांदा १-२
  • बारीक चिरलेला टोमॅटो २-३
  • बारीक चिरलेला लसूण १ चमचा
  • बारीक चिरलेला / किसलेला अदरक १ चमचा
  • मीठ चवीनूसार
  • हळद २ चिमूट
  • लाल तिखट चवीनुसार
  • काळी मिरी पावडर १/२ - १ चमचा
  • तेल १ मोठा चमचा
  • जीरे १ चमचा
  • हिरवी मिरची चे तुकडे १-२ चमचे

अंडा भुर्जी विद रोटी | How to make Anda/ Egg Bhurji with Roti Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम अंडी फोडून एका भांड्यात घ्या , त्यात हिरवी मिरची आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे
  2. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, अदरक, हिरवी मिरची एकत्र ठेवा
  3. कढईत तेल गरम करून त्यात जीरे घाला , वर बारीक चिरलेला कांदा आणि लसूण टाकून , खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावे
  4. यात हळद तिखट आणि धणे पूड घालावी , मिक्स करावे
  5. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि अदरक घालून तेल सुटे पर्यंत परतावे
  6. आता यात फोडून ठेवलेले अंडी घालावे
  7. मंद आचेवर, हळू हळू मिक्स करावे
  8. मिश्रण घट्ट होत जाईल ,
  9. ४-५ मिनीटे , अधून मधून मिक्स करावे , शेवटी कोथिंबीर घालावी आणि अंडा भुर्जी तयार आहे
  10. पोळी पराठा बरोबर टिफिन साठी पॅक करावे

Reviews for Anda/ Egg Bhurji with Roti Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती