मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरण काचऱ्या

Photo of SURAN kachrya by Minal Sardeshpande at BetterButter
891
3
0.0(0)
0

सुरण काचऱ्या

Jul-24-2018
Minal Sardeshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरण काचऱ्या कृती बद्दल

औषधी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. अर्धा की सुरण पांढरा
  2. तीन टीस्पून तेल
  3. अर्धा टीस्पून मोहोरी
  4. अर्धा टीस्पून जीरं
  5. अर्धा टीस्पून हिंग
  6. अर्धा टीस्पून हळद
  7. एक टीस्पून लाल तिखट
  8. एक टीस्पून साखर
  9. मीठ
  10. अर्धी वाटी ओलं खोबरं
  11. आमसुलं सहा

सूचना

  1. सुरण आतून पांढरा बघून घ्या.
  2. सुरणाची साल काढून काचऱ्या करा. खूप पातळ नको.
  3. या काचऱ्यात थोडं पाणी आणि आमसुलं घालून शिजवून घ्या, फोडी शिजूदेत पण तुकडे व्हायला नको.
  4. शिजलेला सुरण चाळणीवर काढा.
  5. आमसुलं काढा.
  6. कढईत मोहोरी, हिंग, जीरं, हळद घालून फोडणी करा.
  7. त्यात काचऱ्या टाका.
  8. मीठ, साखर लाल तिखट घालून परता.
  9. वाफ येऊ द्या.
  10. ओलं खोबरं घालून परता. पोळी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर