मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाचे घावन

Photo of Pole or Ghavan by Sujata Hande-Parab at BetterButter
1091
4
0.0(0)
0

तांदळाचे घावन

Jul-24-2018
Sujata Hande-Parab
487 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाचे घावन कृती बद्दल

घावन हि एक पारंपरिक आणि खूप पुरातन अशी डिश आहे. हि डिश महाराष्ट्रात अतिशय आवडीने खाल्ली जाते. चहा असुंदे किंवा साधी चटनी ह्याबरोबर देखील हे खूप स्वादिष्ट लागतात. अतिशय सरळ आणि सोपी अशी हि डिश नास्ता, दुपारचे, रात्रीचे जेवण किंवा टिफिन साठी खूपच चांगला पर्याय आहे. तांदूळ किंवा कणी धुऊन वाळवून त्यात थोडे मेथीचे दाणे घालून; त्याचे जाडसर पीठ दळून आणून ठेवले कि कधी हि घावन बनवले जाऊ शकते. मेथीचे दाणे हे पर्यायी आहेत नको असतील तर नाही टाकले तरी चालतील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. इडली किंवा डोसा तांदूळ - २ कप
  2. मेथीचे दाणे - १ टेबलस्पून (पर्यायी)
  3. चवीनुसार मीठ
  4. पाणी - 2-3 कप रात्रभर भिजवण्यासाठी, मिश्रणासाठी १ - ३/४ कप
  5. तेल - 3-4 टेबलस्पून
  6. सर्विंग - नारळाची चटणी, टोमॅटो चटनी, चहा, कॉफी. 

सूचना

  1. तांदूळ आणि मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी काढून टाका आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या.
  2. मीठ, पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
  3. नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले तांदूळ मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या.
  4. 4-5 सेकंद पॅनवर ताट ठेवावे. प्लेट काढून घ्या आणि घावन पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
  5. नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर