भरली कारली | Stuffed bitter gourd Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuffed bitter gourd recipe in Marathi,भरली कारली, Teju Auti
भरली कारलीby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

भरली कारली recipe

भरली कारली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed bitter gourd Recipe in Marathi )

  • ४-५ मध्यम आकाराची कारली
  • ५ चमचे दाण्याचे कुट
  • १ मुठ तीळ भाजुन कुट
  • १ मुठ सुके खोबरे भाजुन चुरा करुन
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा कांदा लसुन मसाला
  • जिरे , मीठ, तेल

भरली कारली | How to make Stuffed bitter gourd Recipe in Marathi

  1. कारली धुवुन देठ आणि टोकाच्या बाजुने कापुन आतला गर काढुन टाकावा. आतल्या बाजुला थोडे मीठ लावुन कारली १५-२० मि. साठी बाजुला ठेवुन द्यावीत.
  2. मसाल्याचे सगळे सामान एकत्र करुन नीट एकत्र करावे.
  3. कारली वाफवून घ्यावी.
  4. मसाला आता कारल्यामधे भरावा.
  5. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. उरलेला मसाला त्या तेलात घालुन वरती वाफ़वलेली कारली घालुन व्यवस्थीत परतुन घ्यावे.

My Tip:

मसाला कोरडा वाटल्यास पाणी टाकावे १ चमचा.

Reviews for Stuffed bitter gourd Recipe in Marathi (0)