लोबीया मसाला / चवळी मसाला | Lobiya Masala / Chavali curry Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Lobiya Masala / Chavali curry recipe in Marathi,लोबीया मसाला / चवळी मसाला, Renu Chandratre
लोबीया मसाला / चवळी मसालाby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

लोबीया मसाला / चवळी मसाला recipe

लोबीया मसाला / चवळी मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lobiya Masala / Chavali curry Recipe in Marathi )

  • चवळी १-२ वाटी
  • कांदे २
  • टोमॅटो ३-४
  • लसूण पाकळी ५-८
  • अदरक तुकडा १
  • हिरवी मिरची १-२
  • तेल १-२ मोठा चमचा
  • मोहरी १/२ चमचा
  • जीरे १ चमचा
  • हळद, मीठ, तिखट चवीनुसार
  • किचन किंग मसाला / गरम मसाला १ चमचा

लोबीया मसाला / चवळी मसाला | How to make Lobiya Masala / Chavali curry Recipe in Marathi

  1. चवळी धुवून , १-२ तास पाण्याचे भिजवून ठेवा
  2. नंतर त्यात थोडी हळद आणि मीठ घालावे
  3. कुकर मधे ३-४ शिटी काढाव्यात
  4. एका मिक्सर च्या भांड्यात कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि अद्रक घ्या
  5. बारीक वाटण तयार करा
  6. कढईत तेल गरम करावे , मोहरी जीरे टाका
  7. हळद घालून , लगेच तयार वाटण टाका
  8. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यावा
  9. मसाला परतत असताना त्यात लाल तिखट आणि किचन किंग मसाला पण परतून घ्यावे
  10. अता ह्यात उकळलेले चवळी मिक्स करा
  11. चवीनुसार थोडे मीठ घालावे , गरजेनुसार थोडे पाणी घालून मिक्स करावे
  12. झाकून ५ मिनिटे शिजवा
  13. कोथिंबीर घालावी आणि पोळी पराठा पुरी किंवा भाकरी सोबत टिफिन पॅक करावे , तयार आहे लोबीया मसाला करी

My Tip:

१. चवळी रात्री भिजवून ठेवली तर सकाळी पटकन भाजी तयार होते , वेळ पण वाचतो २.फार पाणी घालू नये, ही करी जरा घट्टच छान लागते

Reviews for Lobiya Masala / Chavali curry Recipe in Marathi (0)