मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे नगेट्स

Photo of Potato nagets by seema Nadkarni at BetterButter
563
1
0.0(0)
0

बटाट्याचे नगेट्स

Jul-25-2018
seema Nadkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे नगेट्स कृती बद्दल

हा नाश्ता लहान मुलांना आणि मोठ्यांना पण आठडेल असा आहे. साधा सोपा आणि जास्त मसालेदार पदार्थ नाही. हे नगेट्स तुम्ही तयार करून फ्रोजन करून पण ठेऊ शकता. मी पण काल रात्री तयार करून आज सकाळी मुलांना डब्यात भरून दिला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 7-8 उकडलेले बटाटे
  2. 1 वाटी मक्याचे दाणे
  3. 1 वाटी पनीर
  4. 1 /2 वाटी चीज किसलेले
  5. 1 चमचा लाल तिखट
  6. 1/4 टि स्पून हळद
  7. चवी पुरते मीठ
  8. 1-2 हिरव्या मिरच्या
  9. कोथिंबीर थोडीशी
  10. 1 चमचा लिंबाचा रस
  11. 1 चमचा काळी मिरी पावडर
  12. 1 कप ब्रेड क्रम्स
  13. 1/2 चमचा कोनफ्लोर
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम उकडलेले बटाटे सोलून मऊ कुस्करून घ्या.
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद आणि लाल तिखट घालून एकत्र करावे.
  3. आता मक्याचे दाणे शिजवून घ्या. त्यात पनीर किसून घ्या, किसलेले चीज एकत्र करावे. चवीला मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर,मिरपूड घालून एकत्र करावे. (हिरवी मिरची नाही आवडत असेल तर नका घालू)
  4. बटाट्याचे मिश्रणात कोनफ्लोर घालून एकत्र करावे आणि त्याची पारी करून वरील मक्याचे मिश्रण भरून छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.
  5. ब्रेड क्रम्स लावून घ्या.
  6. त्या गोळ्याना ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून तेलात तळून घ्यावे किंवा फ्रिज मध्ये ठेवावे लागेल तसे गरमागरम तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर