आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी | FRIRD jackfruit seeds Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • FRIRD jackfruit seeds recipe in Marathi,आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी, Minal Sardeshpande
आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजीby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी recipe

आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FRIRD jackfruit seeds Recipe in Marathi )

  • आठीळा दोन वाट्या
  • दोन टेबलस्पून तेल
  • मोहोरी अर्धा चमचा
  • मीठ
  • तिखट एक चमचा
  • साखर एक चमचा
  • ओलं खोबरं पाव वाटी
  • हळद अर्धा चमचा
  • हिंग अर्धा चमचा

आठीळा( फणसाच्या बिया) ची भाजी | How to make FRIRD jackfruit seeds Recipe in Marathi

  1. आठीळा पाणी घालून शिजवून घ्या.
  2. गार झाल्यावर सोलून तुकडे करा.
  3. कढईत तेल तापवा.
  4. मोहोरी घाला, तडतडली की हिंग , हळद घाला.
  5. त्यात आठीळा तुकडे घालून परता.
  6. मीठ, साखर, तिखट आणि ओलं खोबरं घालून परता.
  7. एक वाफ येऊद्या.
  8. मस्त भाजी तयार आहे

Reviews for FRIRD jackfruit seeds Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo