Photo of kaapnyaa by Seema jambhule at BetterButter
810
3
0.0(0)
0

कापण्या

Jul-25-2018
Seema jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कापण्या कृती बद्दल

गुळाच्या कापण्या ह्या महाराष्टातील सातारा-सांगली ह्या भागात बनवल्या जातात. साधारणपणे आषाढ महिन्यात देवाला नेवेद्या साठी दाखवल्या जातात. गुळ हा आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतो. गुळाच्या कापण्या बनवतांना गव्हाचे पीठ व बेसन वापरले आहे. तसेच ह्यामध्ये बडीशोप, सुंठ, खसखस व गुळ वापरला आहे. बडीशेप, खसखस, सुंठ हे सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते.. आणि मुलांच्या डब्यात हा गोड खाऊ दिला तर मुलं पण आवडीने खातात...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 कप गव्हाचे पीठ
  2. 2 चमचे बेसन
  3. 1 टे स्पून बडीशेप
  4. स्पून सुंठ पावडर 1 चमचा
  5. 1 1/2 कप गुळ (किसून)
  6. मीठ चवीनुसार
  7. खसखस
  8. तेल कापण्या तळण्यासाठी
  9. वेलची पावडर 1 चमचा

सूचना

  1. बडीशेप थोडीशी भाजून त्याची पूड करून घ्या. 
  2. गुळ चिरून त्यामध्ये एक कप टाकून कोमट पाण्यात विरघळवून घ्या.
  3. गव्हाचे पीठ, बेसन मीठ चाळून घ्या. मग त्यामध्ये बडीशेप पावडर, सुंठ पावडर वेलची पावडर घालून चवीने मीठ घालून मिक्स करून घ्या
  4. मग त्यामध्ये दोन टे स्पून कडकडीत तेल घालून चांगले मिक्स करून घ्या
  5. गुळाच्या पाण्यानी पीठ भिजवुन घ्या.
  6. भिजवून झाल्यावर अर्धा तास बाजूला ठेवा
  7.  नंतर पीठाचे एकसारखे गोळे करून घ्या.
  8. एक गोळा घेवून थोडासा लाटून झाल्यावर त्यावरती थोडी खसखस घालून पोळी सारखा जाडसर लाटून घ्या. मग शंकरपाळी सारख्या कापून घ्या.
  9. कढई मध्ये तेल गरम करून शंकरपाळ्या छान कुरकुरीत तळून घ्या.
  10. कापण्या तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर