मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी मुठिया

Photo of Cabbage Muthia by Sujata Hande-Parab at BetterButter
504
5
0.0(0)
0

कोबी मुठिया

Jul-25-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी मुठिया कृती बद्दल

कोबीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि वजन कमी करण्यासाठी, डोळा दृष्टी, ब्रेन आणि हाडांचे आरोग्य सुधारण्या साठी खूप उपयुक्त आहे. महाराष्ट्रात हि अतिशय लोकप्रिय असून तिला "कोबी" असे म्हटले जाते.. कोबी पराठा, पुरी, भाजी, पुलाव हे पदार्थ प्रत्येक घरात खूप लोकप्रिय आहेत. कच्या कोबीची पाने चवदार असतात आणि ती सलाड मध्ये कच्चीच खाल्ली जातात. मुथिया एक गुजराती खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात याला कोबीची वडी असेही म्हटले जाते. कोबीची वडीत मुख्यतः चण्याच्या पिठाचा किंवा बेसनचा मुख्य घटक म्हणून वापर होतो. त्याचबरोबर कधीकधी त्यात रवा किंवा तांदुळाचे पीठ देखील वापरू शकतो. या रेसिपीमध्ये मी काही मसाल्यांबरोबर बेसन, गव्हाचे पीठ, बारीक रवाळ वाटलेला कोबी वापरु शकता. हवाबंद डब्यात टाकून रेफ्रिजरेटर मध्ये 2-3 दिवस ठेवले तरी चांगले राहते. पाहिजे असेल तेव्हा तळून मुलांना टिफिन मध्ये घालून देता येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन - १ कप किंवा १३ टेबलस्पून
  2. गहू पीठ - ४ टेबलस्पून
  3. कोबी - १ कप मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेला. पेस्ट नको (दाबून घेतलेला)
  4. चिंचेची पेस्ट - १ टिस्पून
  5. हिंग - १/२ टिस्पून
  6. धणे पूड - १/२ टिस्पून
  7. जिरेपूड - १/२ टिस्पून
  8. हळद - १/२ टिस्पून
  9. लाल तिखट - १ टिस्पून
  10. किसलेला गूळ– १ टिस्पून
  11. ताजे आले - १ टीस्पून जाडसर वाटलेले 
  12. हिरवी मिरची - २ जाडसर वाटलेले 
  13. लसूण पाकळ्या - ३ जाडसर वाटलेले 
  14. चवीनुसार मीठ
  15. तेल - तळण्यासाठी १-२ टेबलस्पून + २ टीस्पून फोडणी
  16. पाणी - १/२ -१ टेबलस्पून (थोडे थोडे वापरावे) 
  17. फोडणीसाठी - कढीपत्ता पाने - ३-४
  18. तीळ सफेद - १/२ टेबलस्पून 
  19. जिरे - १/२ टेबलस्पून 
  20. हिंग - १/४ टीस्पून

सूचना

  1. एका वाडग्यात बेसन, गव्हाचे पीठ, जीरे, धणे पूड, लाल मिरची पूड, हिंग, तेल, किसलेले गूळ, जाडसर वाटलेले ताजे आले आणि हिरवी मिरची, लसूण घ्या. चांगले मिक्स करा.
  2. कोबीचे मिश्रण, मीठ घाला. चांगले मिक्स करून घ्या.
  3. एकावेळी थोडे थोडे पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. हे थोडे चिकट होईल. कणिक मळतो तसे एकत्र करून घ्या. जर पाणी लागत असेल तरच घाला
  4. हातवर थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. मिश्रणाचे दोन लंबकार (४-५ इंच लांब) गोळ्यांमध्ये विभाजन करा.
  5. प्लेट वर थोडेसे तेल पसरवून घ्या आणि बनवलेले लॉग्स त्यावर ठेवा.
  6. स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवुन घ्या. (प्रेशर कूकरचा वापर केल्यास, 3 शिट्ट्यासाठी शिजवा आणि स्टीमरमध्ये १८-२० मिनिटे ते शिजवावे. गॅस बंद करा. कुकरच्या दाब सहजपणे खाली येऊ द्या.
  7. थंड होऊ द्या. दीड इंच जाड काप करून घ्या.
  8. एका कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता पाने घाला. काही सेकंद ढवळा.
  9. जिरे, पांढरे तीळ, घालून त्यांना तडतडू द्या. हिंग घाला. परतून घ्या
  10. कापलेल्या मुठिया किंवा वड्यां घाला आणि गोल्डन ब्राऊन, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  11. चहा, कॉफ़ीसह गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर