मुख्यपृष्ठ / पाककृती / फुलकोबी मसाला पुरी

Photo of Cauliflower Masala Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
562
10
0.0(0)
0

फुलकोबी मसाला पुरी

Jul-25-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुलकोबी मसाला पुरी कृती बद्दल

ह्या रेसिपीत मी गव्हाचे पीठ, फुलकोबी ची प्युरी, कुटलेले जिरे, ओवा घातलेला आहे. ह्या पुरीज अतिशय स्वादिष्ट लागतात. मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिन साठी साध्या पुरी ऐवजी अशी पुरी हि अतिशय उत्तम पर्याय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू पीठ - १ १/२ कप
  2. फुलकोबी प्युरी – ३/४ - १ कप
  3. ओवा - १/२ टीस्पून जाडसर वाटलेला
  4. जिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला)
  5. लसूण पेस्ट - १/२ टिस्पून (3-4 पाकळ्या)
  6. हिरव्या मिरच्या - १ बारीक (जाडसर वाटून घेतलेला)
  7. जाड दही - 1 टेबलस्पून
  8. स्वादानुसार मीठ
  9. तेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी
  10. पाणी- २-३ टेबलस्पून किंवा घट्ट पीठ मळण्यासाठीआवश्यक असल्यासच टाका.

सूचना

  1. फुलकोबीच्या तुरे वेगळे करावेत . गरम पाण्यात थोडे मीठ आणि तुरे घालून २ मिनिटे उकळी काढून घ्यावीत. नंतर लगेचच ते गाळून घेऊन थंड पाणी ओतावे आणि निथळण्यास ठेवावे. त्याची मिक्सरला लावून पेस्ट किंवा प्युरी करावी.
  2. एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ, तेल, कुटलेले जिरे, ओवा, जाडसर वाटलेली हिरवी मिरची, दही घ्या. चांगले मिक्स करावे.
  3. फुलगोबीची प्युरी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे. कणिक घट्टच ठेवावी. झाकण ठेवून 20- 30मिनिटे बाजूला ठेवा.
  4. एका कढाईत तेल गरम करावे. कणिकचे थोडे भाग घ्या आणि गोळे करा.
  5. थोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.
  6. एक गोळा ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
  7. मध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
  8. बटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर