मुख्यपृष्ठ / पाककृती / अख्या मुगाच्या एडण्या

Photo of Whole Moong Ednya by archana chaudhari at BetterButter
740
2
0.0(0)
0

अख्या मुगाच्या एडण्या

Jul-26-2018
archana chaudhari
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अख्या मुगाच्या एडण्या कृती बद्दल

अख्खे मूग हे अतिशय पौष्टीक असतात....डब्याला मुगाच्या एडण्या दिल्यावर एक समतोल खाणे होईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अख्खे हिरवे मूग २ कप
  2. हिरव्या मिरच्या ५
  3. लसूण पाकळ्या ४
  4. पालक १कप बारीक चिरलेला
  5. बेसन पीठ १ टेबलस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल वरून लावण्यासाठी

सूचना

  1. अख्खे हिरवे मूग स्वछ धुवून १० तास पाण्यात भिजत ठेवा.पाणी जर जास्त टाका, मुगाला फुलण्यासाठी.
  2. १०तासांनंतर मूगातील पाणी काढून टाका.
  3. मिक्सर च्या भांड्यात भिजवलेले अख्खे मूग,हिरव्या मिरच्या, लसूण,पालक,मीठ आणि पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
  4. एका भांड्यात वरील वाटण काढून घ्या,आणि त्यात बेसन पीठ टाकून चांगले एकत्र करुन घ्या.
  5. नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा.
  6. आता २ टेबलस्पून वरील मुगाचे मिश्रण टाका, हळूहळू पसरवा आणि तेल टाका.
  7. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. थोडे तेल सोडा.
  8. गरम गरम एडण्या दही,सॉस सोबत सर्व्ह करा.
  9. लोणचे,चटणी सोबतही छान लागते.....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर