मेथी पराठा | METHI paratha Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • METHI paratha recipe in Marathi,मेथी पराठा, Minal Sardeshpande
मेथी पराठाby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

6

0

मेथी पराठा recipe

मेथी पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METHI paratha Recipe in Marathi )

  • पाच वाट्या कणिक
  • अर्धी वाटी बेसन
  • अर्धी वाटी तांदूळ पीठ
  • अर्धा चमचा लसूण पेस्ट
  • दोन चमचे लाल तिखट
  • मीठ
  • हळद एक चमचा
  • मेथी जुडी एक
  • तेल पाव वाटी
  • सुकी कणिक
  • पाणी

मेथी पराठा | How to make METHI paratha Recipe in Marathi

  1. मेथी निवडून घ्या.
  2. धुवून बारीक चिरा.
  3. कणिक, बेसन, तांदूळ पीठ एकत्र करा.
  4. त्यात लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
  5. चिरलेली मेथी मिसळा.
  6. तेल घाला. पिठाची चव बघा.
  7. गरजेनुसार पाणी घालून पोळ्यांची भिजवतो तशी कणिक भिजवा.
  8. पिठाची गोळी घेऊन लाटा.
  9. घडीची पोळी करतो तसा पराठा लाटा.
  10. तवा तापवून दोन्ही बाजूने तेल सोडून भाजा.
  11. चटणी आणि लोण्या सोबत सर्व्ह करा.

My Tip:

यात मेथी ऐवजी पालक, लाल माठ, मुळा अशी कोणतीही भाजी घालू शकता.

Reviews for METHI paratha Recipe in Marathi (0)