मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवर बटाटा भाजी

Photo of FLOWER batata bhaji by Minal Sardeshpande at BetterButter
1035
3
0.0(0)
0

फ्लॉवर बटाटा भाजी

Jul-26-2018
Minal Sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवर बटाटा भाजी कृती बद्दल

झटपट चविष्ट सगळ्यांच्या आवडीची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अर्धा की फ्लॉवर
  2. दोन मध्यम बटाटे
  3. दोन टॉमेटो
  4. पाव वाटी ओलं खोबरं
  5. एक चमचा लाल तिखट
  6. एक चमचा साखर
  7. मीठ
  8. तेल दोन टेबलस्पून
  9. मोहोरी अर्धा चमचा
  10. ओवा एक चमचा
  11. हळद अर्धा चमचा
  12. कांदे दोन
  13. कांदा लसूण मसाला(ऐच्छिक)

सूचना

  1. फ्लॉवर साफ करून तुरे काढून मीठ घातलेल्या कोमट पाण्यात ठेवा.
  2. बटाटे सोलून आवडीप्रमाणे चिरा, पाण्यात टाका.
  3. टॉमेटो बिया काढून चिरा.
  4. कांदे सोलून चिरा.
  5. कढईत तेल तापवा.
  6. मोहोरी घाला, ती तडतडली की ओवा घाला.
  7. आता कांदा घालून परता.
  8. परतला की बटाटा घाला. परता आणि पाच मीनीट मंद गॅसवर झाकण ठेवून वाफ येऊद्या.
  9. आता हळद, तिखट घाला. परता.
  10. थोडं मीठ घालून परता.
  11. फ्लॉवर चे तुरे घाला.परतून झाकण ठेवा.
  12. पाच मिनिटं ठेवून चवीनुसार मीठ, साखर घाला, टॉमेटो घाला.
  13. एक वाफ काढा.
  14. आवडत असेल तर कांदा लसूण मसाला घालून परता.
  15. ओलं खोबरं घाला.
  16. पोळीसोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर