पालक मका चीजी आपे | Spinach Corn Cheese Aappe Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Spinach Corn Cheese Aappe recipe in Marathi,पालक मका चीजी आपे, Vaishali Joshi
पालक मका चीजी आपेby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    12

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

पालक मका चीजी आपे recipe

पालक मका चीजी आपे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spinach Corn Cheese Aappe Recipe in Marathi )

  • तांदुळ ११/२ कप
  • उड़द डाळ १/२ कप
  • मेथी दाणे १/२ चमचा
  • पालक १०० ग्राम
  • चीझ २ क्यूब्स
  • मोझेरेला चीझ
  • चाट मसाला ३ चमचे
  • बटर
  • मीठ

पालक मका चीजी आपे | How to make Spinach Corn Cheese Aappe Recipe in Marathi

  1. तांदुळ , डाळ आणि मेथी वेगवेगळे धुवून घेउन वेगवेगळ्य़ा भांड्यात ४ -५तास भिजत घाला
  2. भिजल्यावर अलगअलग वाटुन घ्या पाणी टाकुन मिक्सर मधे आणि तिन्ही गोष्टी एकत्र करुन बैटर बनवून ६-७ तास आंबत ठेवा . हे तयार झाले आप्पे चे बैटर
  3. पालक ब्लांच करून घ्या , कॉर्न वाफवून घ्या , मिरच्या अगदी बारीक़ चिरुन घ्या , चीझ क्यूब किसुन आणि मोझेरेला चीज चोकोन छोटे तुकडे कापून ठेवा .
  4. ब्लांच केलेला पालक पिळुन घेवुन बारीक़ चॉप करा त्यात कॉर्न , किसलेले चीज , चाट मसाला त्याला हलक्या हाताने फिलिंग मिक्स करून घ्या .
  5. तयार बैटर मधे चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्या .
  6. आप्पे पात्र गरम करून त्यात बटर घाला आणि चमच्याने थोड थोड बैटर घाला त्यावर तयार फिलिंग टाका त्याच्या मधे मोझेरेला चीज चा तुकडा पेरा आणि वरुन बैटर घालून कव्हर करा आजुबजुने बटर सोडा दोन्ही बाजूने क्रिस्पी करुन घ्या .
  7. असेच सगळे आप्पे करून घ्या , थोड़े गार झाल्यावर टिफिन मधे ठेवा .

Reviews for Spinach Corn Cheese Aappe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo