मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता

Photo of Veg biryani with onion rayta by priya Asawa at BetterButter
615
2
0.0(0)
0

व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता

Jul-27-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता कृती बद्दल

हेल्दी टिफिन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • हैद्राबादी
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदुळ 2 कप
  2. तेल 1/2 कप
  3. चांगला तुप 1/2 कप
  4. बटाटे 2 लांब व पातळ कापलेले
  5. कांदे 2 ते 3 लांब व पातळ कापलेले
  6. काजु 10-12
  7. किसमीस 10-12
  8. वेलची 3, लवंग 3, तमालपत्र 2, काळीमीरी 5-6 दाणे, शहाजीरा 1 चमचा, लाल तिखट पाव चमचा, हळद 1/2 चमचा, धने - जीरे पावडर 2 चमचे, गरम मसाला , वेलची पूड 1/2 चमचा, मीठ व साखर चवीनुसार
  9. दही 1/2 कप
  10. दुधाची साय पाव कप
  11. मध्यम आकारात कापलेली मिक्स भाज्या गाजर, फुलवर, शिमला, हिरवे वटाने
  12. मिक्सर मधुन काढण्याचे सामान
  13. कांदे 2
  14. टोमॅटो 1
  15. लसणाची 5-6 कळ्या
  16. किसलेला आल् 1 चमचा
  17. हिरवी मिरची 2-3
  18. कोथिंबीर 2 चमचे
  19. पुदिनयाचे 10 - 15 पान
  20. बडीशेप 1 चमचा
  21. काजु 8-10
  22. कांद्याचा रायता
  23. घट्ट दही 2 कप
  24. चिरलेला बारीक कांदा 1/2 कप
  25. लाल तिखट 1/2 चमचा
  26. जीरा पावडर 1/2 चमचा
  27. चाट मसाला 1/2 चमचा
  28. मीठ व साखर चवीनुसार

सूचना

  1. मिक्सर मधुन काढण्याचे सामान सगळे एकजीव काढून घ्या
  2. भात एकदम मोकळा बनवून घ्या
  3. तेल गरम करून बटाटे लालसर तळून घ्या मग त्याच्यात कांदा हि लालसर व कुरकुरीत तळून घ्या आणि काजू व किसमीस थोडे तळून काढुन घ्या
  4. तुप गरम करून आख्या मसाला ची फोडणी द्या मग मिक्सर मधुन काढलेले टाकून तुप सुटेपर्यंत भाजुन घ्या व त्यात लाल तिखट, हळद, धने जीरे पावडर, गरम मसाला, वेलची पूड, मीठ, साखर, दही, दुधाची साय टाकून थोडे भाजुन घ्या
  5. बनवलेल्या भातात तळलेले बटाटे, कांदे, काजु व किसमीस टाकून मिक्स करून व भाताची तीन भाग करून घ्या
  6. एका चपट्या गोल डब्यात तुप लावुन त्याचा भाताचा एक भाग टाकुन पसरुन घ्या त्याचावर तयार केलेली भाजी आर्धी टाकून पसरुन घ्या परत त्या भाजीवर भाताचा दुसरा भाग टाकुन पसरुन घ्या व राहिलेली आर्धी भाजी टाकून पसरुन घ्या शेवटी राहिलेला भाताचा तिसरा भाग पसरुन घ्या डब्याचा झाकणाला सिल्व्हर फाॅइल पेपर लावून घ्या व झाकण लावून घ्या
  7. तवा गरम करून 10 मिनीट कमी आचेवर वाफवून घ्या
  8. व्हेज बिर्याणी तयार
  9. कांद्याचा रायता
  10. एक बाउल मध्ये दही, कांदा, लाल तिखट, जीरे पावडर, चाट मसाला, मीठ व साखर टाकून मिक्स करून घ्या
  11. कांद्याचा रायता तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर