Photo of Vadapav by Teju Auti at BetterButter
1095
3
0.0(0)
0

वडा पाव

Jul-28-2018
Teju Auti
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा पाव कृती बद्दल

Tasty. , spicy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ मध्यम बटाटे
  2. ४ ते ५ हिरव्या मिरच्या
  3. वडे तळण्यासाठी तेल
  4. ४-५ लसणींची पेस्ट
  5. १ इंच आले पेस्ट
  6. ३-४ कढीपत्ता पाने
  7. कोथिंबीर
  8. २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद चवीपुरते मीठ
  9. १ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा

सूचना

  1. शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावे. कढईत २ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. त्यात कुस्करलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मीठ घालावे. मीठ आणि फोडणीचे तेल बटाट्याला व्यवस्थित लागेल असे कालथ्याने मिक्स करावे. तयार भाजीचे २ इंच इतपत गोळे करावे.
  2. भाजी तयार झाली कि आवरणासाठी चणा पिठ पाण्यात भिजवावे. अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
  3. कढईत तेल गरम करावे. तळताना वडा तेलात पुर्ण बुडेल इतपत तेल कढईत घालावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे. भिजवलेल्या पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. जर तो टाकल्या टाकल्या वर आला तर तेल तापले आहे असे समजावे. तेल तापले कि गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
  4. ४) भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे (किंवा तळताना कढईत सुटसुटीत मावतील एवढे) गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर