Photo of Butter chicken by seema Nadkarni at BetterButter
548
0
0.0(0)
0

बटर चिकन

Jul-28-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर चिकन कृती बद्दल

रेस्टॉरंट स्टाइल चिकन करी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 500 ग्राम चिकन
  2. 1/2 कप दही
  3. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 2-3 कांदा
  5. 2-3 टोमॅटो
  6. 4-5 काजू चे तूकडे
  7. 1-2 लवंग
  8. 1 दालचिनी
  9. 1 तमालपत्र
  10. 1-2 इलायची
  11. 2 चमचा चीकन मसाला
  12. 1/4 टि स्पून हळद
  13. 1-2 चमचा लाल तिखट
  14. 1/2 कप क्रिम
  15. चवी पुरते मीठ
  16. कोथिंबीर

सूचना

  1. सौ प्रथम चीकन ला स्वच्छ धुवून घ्या. दही, 1 चमचा आले लसुण पेस्ट, हळद घालून एकत्र करून 1/2 तास मेरीनेट करावे.
  2. कांदे + टोमॅटो बारीक चिरून घ्यावी.
  3. एका पेन मध्ये थोडे तेल घालून आले - लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
  4. चीरलेला कांदा, टोमॅटो, काजू चे तूकडे टाकून परतून घ्यावे, थोडे पाणी घालून झाकण ठेवून वाफ काढावी.
  5. कूकर मध्ये थोडे बटर टाकून मेरीनेट केलेल्या चीकन व्यवस्थित परतून घ्यावे. 1/2 कप कोमट पाणी घालून 2-3 शीट्या काढून घ्या.
  6. कांदा - टोमॅटो च्या मिश्रणाला मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.
  7. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो ची पेस्ट टाकून परतून घ्या, त्यात शिजवून घेतलेल चीकन घालून एकत्र करावे.
  8. लाल तिखट, चवीपुरते मीठ, चीकन मसाला टाकून एक उकळी आणावी.
  9. त्यात 1/2 कप क्रिम घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर