मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचे थालीपीठ

Photo of Jowar thepla by Manasvi Pawar at BetterButter
635
1
0.0(0)
0

ज्वारीचे थालीपीठ

Jul-29-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचे थालीपीठ कृती बद्दल

या रेसिपी मध्ये मी मुख्य घटक ज्वारीच पीठ वापरले आहे त्यामुळे पटकन एक पौष्टीक रेसिपी आपल्याला करता येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अडीच वाटी ज्वारी पीठ
  2. एक वाटी बेसन
  3. १/२ वाटी तांदळाचे पीठ
  4. एक चमचा गरम मसाला
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चमचा लाल तिखट
  7. हळद छोटा चमचा
  8. धणे जिरे पूड एक एक चमचा
  9. हिंग १/२ चमचा
  10. कोथिंबीर पाव वाटी चिरून
  11. दोन कांदे बारीक चिरून
  12. तेल भाजण्यासाठी

सूचना

  1. सगळी पीठे एकत्र करून घ्या
  2. पीठात मीठ लाल तिखट कोथिंबीर हळद धणेपूड जिरेपूड सगळे मसाले घालून लागेल तेवढे पाणी आणि कांदा घालून पीठ मळून घ्यावे
  3. पीठाचे गोळे करून घ्यावेत
  4. तवा गरम करून एका रुमालावर गोळा घेऊन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे
  5. तव्यावर तेल सोडून थालीपीठ घालावे
  6. दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावे
  7. साॅस बरोबर डब्यात द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर