ब्रेड चा खाकरा | BREAD KHKARA Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • BREAD KHKARA recipe in Marathi,ब्रेड चा खाकरा, जयश्री भवाळकर
ब्रेड चा खाकराby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

ब्रेड चा खाकरा recipe

ब्रेड चा खाकरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BREAD KHKARA Recipe in Marathi )

  • 4 ब्रेड स्लाइस कडा काढलेले
  • 2 मोठे चमचे बेसन
  • 1 चमचा जीरे पूड
  • 1/2 चमचा /चवीनुसार मीठ
  • जीरावन मसाला /चाट मसाला

ब्रेड चा खाकरा | How to make BREAD KHKARA Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात ब्रेड स्लाइस कुस्करून घ्या.
  2. ह्यात जीरे पूड, मीठ घालून मिक्स करा.
  3. आता पाण्यानी कणिक सारख मळून घ्या.
  4. ह्या कणकेच्या छोट्या लाट्या करून घ्या.
  5. एक एक लाटी ची पातळ पोळी सारखी लाटून तव्यावर दोन्ही कडून थोडं थोडं शेकून एकावर एक ठेवत चला.
  6. आता हा पोळ्यांचा ढीग उलटून ठेवा म्हणजे सगळ्यात पहली पोळी (खालची) वर येईल.
  7. आता ह्या पोळ्या एक एक करून थोडं तेल लावून पराठा मेकर नी दाबून दाबून क्रिस्पी शेकून घ्या.
  8. ब्रेड च्या प्रत्येक खाखरा वर जीरावन / चाट मसाला भुरकून एयर टाईट डब्यात ठेवा आणि हवे तेव्हा चहा बरोबर किंवा असेच खायला सर्व्ह करा.

My Tip:

ब्रेड च्या कणकेत हवे तर कसुरी मेथी घालू शकता.

Reviews for BREAD KHKARA Recipe in Marathi (0)