मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे पॅन केक

Photo of Dhudhi pancake by Rohini Rathi at BetterButter
922
3
0.0(0)
0

दुधीचे पॅन केक

Jul-29-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे पॅन केक कृती बद्दल

लहान मुलांना दुधी आवडत नाही दुधी वापरून हा वेगळा पॅन केक्स प्रकार बनवून आपण त्यांना दुधी खाऊ घालू शकतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला दुधी एक कप
  2. हिरवी मिरचीची पेस्ट एक टिस्पून
  3. लसणाची पेस्ट एक टिस्पून
  4. आल्याची पेस्ट अर्धा टी स्पून
  5. इडली रवा अर्धा कप
  6. बेसन पीठ पाव कप
  7. तांदळाचे पीठ अर्धा कप
  8. हळदी पावडर पाव टी स्पून
  9. साखर एक टेबल स्पून
  10. दही दोन टेबल स्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल केक भाजण्यासाठी
  13. सोडा पाव टी स्पून
  14. तेल एक टेबल स्पून मॅटरमध्ये घालण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम किसलेला दुधी एका बाऊलमध्ये घ्यावा
  2. नंतर त्यात इडली रवा बेसन पिठ तांदळाचे पीठ एकत्र करून घ्यावे
  3. नंतर हिरवी मिरचीची पेस्ट आल्याची पेस्ट लसणाची पेस्ट तेल सोडा चवीनुसार मीठ साखर हळदी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. नंतर दोन टेबल स्पून दही व पाणी च्या साहाय्याने मध्यम मॅटर बनवून घ्यावे
  5. नॉनस्टिक पॅन गरम करून तेल आणि ग्रीस करून घ्यावे
  6. तयार बॅटरीची छोटे-छोटे पॅनकेक प्रमाणे धिरडे पसरवून घ्यावे
  7. मंद आचेवर दोन्ही बाजूने पॅन केक भाजून घ्यावा
  8. अशा प्रकारे तयार त्यांचे टोमॅटो केचप बरोबर टिफिन मध्ये भरून द्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर