पालक कॉर्न भात | Spinach corn rice Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Spinach corn rice recipe in Marathi,पालक कॉर्न भात, Susmita Tadwalkar
पालक कॉर्न भातby Susmita Tadwalkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

पालक कॉर्न भात recipe

पालक कॉर्न भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spinach corn rice Recipe in Marathi )

  • १ वाटी तांदूळ
  • १-१/२ वाटी निवडलेला पालक
  • १ वाटी काॅर्नचे दाणे
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • १ हिरवी मिरची
  • थोडं आलं
  • १/४ चमचा बिर्यानी मसाला
  • २ मोठे चमचे तेल
  • थोडं मिठ, जिरं, हिंग

पालक कॉर्न भात | How to make Spinach corn rice Recipe in Marathi

  1. तांदूळ धुवून भात करुन (किंचित कमी शिजवा) गार करा
  2. पालक गरम पाण्यातून काढून घ्या
  3. थोडा गार झाल्यावर पालक, हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून घ्या
  4. काॅर्न चे दाणे कुकर मधून शिजवून घ्या
  5. तेल गरम करा, जिरं व ‌हिंग घाला
  6. भात घालून निट परता
  7. वाटलेला पालक व काॅर्न, मिठ व बिर्यानी मसाला घाला
  8. थोडा वेळ परतून झाल्यावर गॅस बंद करा आणि डब्यात भरा

My Tip:

फार वेळ पालक शिजवू नये नाहितर पालकाचा रंग जातो

Reviews for Spinach corn rice Recipe in Marathi (0)