गवारीची सोपी भाजी | Gavarichi sopi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Gavarichi sopi bhaji recipe in Marathi,गवारीची सोपी भाजी, Aarti Nijapkar
गवारीची सोपी भाजीby Aarti Nijapkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

गवारीची सोपी भाजी recipe

गवारीची सोपी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gavarichi sopi bhaji Recipe in Marathi )

  • गवार २५० ग्रॅम
  • कांदा १ मोठा
  • टोमॅटो १ मध्यम
  • आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  • हिरची मिरची पेस्ट १/२ लहान चमचा
  • कोथिंबीर १ मोठं चमचा
  • तेल २ मोठे चमचे
  • जिरं १/२ चमचा
  • मोहरी १/३ लहान चमचा
  • कडीपत्ता ८ ते १०
  • हिंग १/२ लहान चमचा
  • मीठ स्वादानुसार
  • हळद १/२ लहान चमचा
  • गरम मसाला १ लहान चमचा
  • लाल तिखट १ लहान चमचा

गवारीची सोपी भाजी | How to make Gavarichi sopi bhaji Recipe in Marathi

  1. गवारीच्या शेंगा निवडून तोडू त्या धुवून घ्या
  2. आता एका टोपात घालून त्यात पुरेसं पाणी घाला त्यात मोटज घालून गवार उकळवून घ्या
  3. अर्धे शिजले की गॅस बंद करून त्यातले गवार चाळणीत काढून घ्या
  4. आता कढईत तेल घालून उकळलेल्या गवार भाजून घ्या भाजून झाल्यावर ताटात काढून ठेवा
  5. त्याच कढईत तेल घाला
  6. जिरं, मोहरी, कडीपत्ता घाला तडतडली की त्यात हिंग घाला
  7. आता बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला व चांगलं परतवून घ्या
  8. आता आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, घालून व्यवस्थित परतवून घ्या
  9. चवीनुसार मिठव हळद घालून घ्या
  10. भाजलेल्या मसल्याना तेल सुटलं की त्यात मसाले घाला व पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या
  11. चिरलेली कोथिंबीर घाला
  12. थोडंस मसाल्यात पाणी शिंपडा मसाला एकजीव करून घ्या
  13. आता भाजलेली गवार मसाल्यात घालून एकत्र करून घ्या
  14. ५ ते ६ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या
  15. शिजलेल्या गरमा गरम भाजीवर कोथिंबीर घाला व गॅस बंद करा
  16. तयार भाजी पोळी , भाकरी सोबत खा

My Tip:

उकळवून घेतलेले भाज्या नेहमी तेलावर परतवून घ्या... म्हणजे चिकट किंवा त्याचे तुकडे होणार नाही

Reviews for Gavarichi sopi bhaji Recipe in Marathi (0)