मटण रस्सा आणि भात | Mutton rassa ani bhaat Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mutton rassa ani bhaat recipe in Marathi,मटण रस्सा आणि भात, Aarti Nijapkar
मटण रस्सा आणि भातby Aarti Nijapkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मटण रस्सा आणि भात recipe

मटण रस्सा आणि भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton rassa ani bhaat Recipe in Marathi )

  • मटण रस्सा
  • शिजवलेलं मटण २०० ग्रॅम
  • वाटणासाठी मसाला
  • कांदा चिरलरेला १ मध्यम
  • टोमॅटो १ लहान
  • आलं १ इंच
  • लसूण ७ ते ८ पाकळ्या
  • कोथिंबीर १ मोठा चमचा
  • पुदिना १ लहान चमचा
  • जिरे १ लहान चमचा
  • धने १ लहान चमचा
  • तेल २ मोठे चमचे
  • मीठ स्वादानुसार
  • हळद १ लहान चमचा
  • लाल तिखट १ मोठा चमचा
  • गरम मसाला १ लहान चमचा
  • लेमोन राईस
  • तांदूळ १/२ वाटी
  • पाणी गरजेनुसार
  • मीठ स्वादानुसार
  • हळद १ चमचा
  • लिंबाचा रस १ मोठा चमचा
  • टमाटर १ लहान
  • हिरवे वाटाणे १/३ कप

मटण रस्सा आणि भात | How to make Mutton rassa ani bhaat Recipe in Marathi

  1. मटण रस्सा
  2. वाटणासाठी घेतलेले साहित्य तव्यावर तेलात व्यवस्थित भाजून घ्या
  3. गार करून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या पाणी घालून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या
  4. एका टोपात तेल तापवून त्यात वाटलेला वाटण घालून तेलात शिजेपर्यंत परतवून घ्या तेल सुटेपर्यंत परतवून घ्या
  5. आता मीठ स्वादानुसार , हळद , लाल तिखट , गरम मसाला घालून मसाला एकजीव करू घ्या
  6. शिजवलेलं मटण मसाल्यात घालून मसल्यासोबत व्यवस्थित परतवून घ्या
  7. शिजवलेल्या मटणाचं पाणी घाला
  8. चांगली उकळी येऊ द्या
  9. मटण आधीच शिजवून घेतल्यामूळे फार वेळ शिजवू नये
  10. बारीक कोथिंबीर भुरभुरून घ्या मग गॅस बंद करा
  11. लेमन राइस
  12. भात शिजवून घ्या
  13. मग कढईत तेल तापवून त्यात सर्व साहित्यांची फोडणी द्या
  14. मग भात सुटसुटीत करून कढईत घाला एकजीव करून घ्या
  15. गरमागरम लेमन राइस व मटण रस्सा तयार आहे

Reviews for Mutton rassa ani bhaat Recipe in Marathi (0)