वांग्याचं भरीत आणि भाकरी | Vangyach bharit ani bhakri Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Vangyach bharit ani bhakri recipe in Marathi,वांग्याचं भरीत आणि भाकरी, Aarti Nijapkar
वांग्याचं भरीत आणि भाकरीby Aarti Nijapkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

वांग्याचं भरीत आणि भाकरी recipe

वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vangyach bharit ani bhakri Recipe in Marathi )

  • वांग्याचं भरीत
  • भरताचं वांग १ मध्यम आकाराच
  • लसूण ८ ते १०
  • कांदा चिरलेला १ मोठा
  • टोमॅटो चिरलेला १ मध्यम
  • कोथिंबीर २ मोठा चमचा
  • तेल ३ मोठे चमचे
  • जिरे १चमचा
  • मोहरी १/२ चमचा
  • कडीपत्ता ६ ते ७ पाने
  • हिंग १/३ लहान चमचा
  • लाल तिखट १ मोठा चमचा
  • हळद १/३ लहान चमचा
  • गरम मसाला १/२ मोठा चमचा
  • धणे पावडर १/२ मोठा चमचा
  • जिरे पावडर १/२ मोठा चमचा
  • मीठ स्वादानुसार

वांग्याचं भरीत आणि भाकरी | How to make Vangyach bharit ani bhakri Recipe in Marathi

  1. भरताचं वांग घ्या ते धुवून घ्या
  2. आता बाजूला थोडे थोडे चीर मारून त्यात लसणाच्या पाकळ्या घाला वरून व आतून तेल लावून घ्या
  3. गॅस वर हे वांग सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्या
  4. वांग्याचा खमंग येईपर्यंत भाजून घ्या
  5. गॅस बंद करून वांग ताटात काढून घ्या व त्यातले लसूण काढून ते बारीक चिरून घ्या
  6. वरचे साल काढून टाका बियाचं प्रमाण जास्त असेल तर बिया काढा
  7. वांग बारीक कापा किंवा मॅश करून घ्या
  8. कढईत तेल तापवून घ्या त्यात जिरे मोहरी घाला तडतडली की त्यात कापलेली लसूण घालून परतवून घ्या
  9. आता कडीपत्ता घाला तेलात भाजले की त्यात चिरलेला कांदा टोमॅटो घाला व परतवून घ्या
  10. लालसर भाजून झाले की त्यात स्वादानुसार मीठ व हळद घाला
  11. त्यात धने जिरे पावडर , गरम मसाला , लाल तिखट घालून व्यवस्थित मसाला एकजीव करून घ्या
  12. आता चिरलेली कोथिंबीर घाला व परतवून घ्या
  13. भरताचं वांग घालून एकजीव करून घ्या
  14. झाकण ठेवून ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्या
  15. तयार भरीत वर कोथिंबीर घाला व गॅस बंद करा
  16. मिरचीचा ठेचा
  17. हिरव्या मिरच्या , शेंगदाणे, जिरे , लसूण तव्यावर भाजून घ्या
  18. मिक्सर च्या जार मध्ये घालून ते जाडसर वाटून घ्या चवीनुसार मीठ घाला व एकजीव करून घ्या
  19. आता वांग्याचं भरीत , भाकरी , मिरचीचा ठेचा तयार आहे

My Tip:

वांग्याच्या भरीत साठी भरताचं वांगच घावे

Reviews for Vangyach bharit ani bhakri Recipe in Marathi (0)