मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पिठाची नानकटाई

Photo of Rajgira flour Nankatai by archana chaudhari at BetterButter
752
12
0.0(0)
0

राजगिरा पिठाची नानकटाई

Aug-03-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पिठाची नानकटाई कृती बद्दल

असा पौष्टिक आणि छान पदार्थ उपवासाला असल्यावर मज्जाच मज्जा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. राजगिऱ्याचे पीठ १/२ कप
  2. बदाम पावडर १/२ कप
  3. पिठीसाखर २ टेबलस्पून
  4. गार लोणी २ टेबलस्पून(मीठ नसलेले, घरचे असेल तर छानच)
  5. सोडा १/२ टीस्पून
  6. मीठ १ चिमूटभर

सूचना

  1. एका भांड्यात लोणी आणि पिठीसाखर फेसून घ्या.
  2. फेसलेल्या मिश्रणात राजगिऱ्याचे पीठ आणि बदाम पावडर,सोडा टाकून छान एकत्र करुन घ्या.
  3. तयार झालेला गोळा एका क्लिंग फिल्म मध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये १० मिनिटे ठेवा.
  4. आता फ्रिजमधून काढलेल्या गोळ्यांचे समान भाग करून घ्या.
  5. एका ताटामध्ये बटर पेपर लावून ठेवा.
  6. आता समान भाग केलेल्या गोळ्यांचे गोल गोल करून,अंगठयाने हलकेच मधे दाबा.
  7. तयार गोल बटर पेपर वर ठेवा.
  8. ओव्हन १८० अंश सेंटिग्रेड ला तापत ठेवा.
  9. आता वरील गोळ्यांचे ताट ओव्हनच्या रॅक वॉर ठेऊन १८० अंश सेंटिग्रेड ला १५ मिनिटे बेक करा.
  10. मध्ये मध्ये बघत रहा...
  11. १५ मिनिटे झाल्यावर राजगिऱ्याच्या नानकटाई गर झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  12. पौष्टिक नानकटाई तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर