उपवासाचा ढोकळा | Farali Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Farali Dhokla recipe in Marathi,उपवासाचा ढोकळा, Archana Chaudhari
उपवासाचा ढोकळाby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

उपवासाचा ढोकळा recipe

उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali Dhokla Recipe in Marathi )

  • भगर ((जाडसर पीठ) १/२ कप
  • साबुदाणा (जाडसर पीठ) १ टेबलस्पून
  • दही १/४ कप
  • पाणी १/४ कप +१टेबलस्पून
  • सोडा १/४ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • साखर १टीस्पून
  • लिंबू रस 1 १ टीस्पून
  • तेल १टेबलस्पून+१टीस्पून
  • जिरे १टीस्पून
  • हिरवी मिरच्या २ लांब चिरून
  • शेंगदाण्याचे जाडसर कूट १टेबलस्पून

उपवासाचा ढोकळा | How to make Farali Dhokla Recipe in Marathi

  1. भगरचे पीठ,साबुदाण्याचे पीठ,१/४ कप दही,१/४कप पाणी,मीठ,१टीस्पून तेल,साखर,लिंबू रस एका भांड्यात एकत्र करून भिजवून घ्या.
  2. १५ मिनिटे झाकून ठेवा.
  3. १५मिनिटानंतर त्यात १टेबलस्पून पाणी टाका.
  4. सोडा टाका.
  5. ढोकळा बनविण्याच्या भांड्याला तेल लावून घ्या.
  6. वरील मिश्रण त्या भांड्यात टाकून २० मिनिटे वाफवून घ्या.
  7. २० मिनिटांनंतर ढोकळा तयार झाला.
  8. आता १टेबलस्पून तेलात जिरे ,मिरचीची फोडणी देऊन त्या ढोकल्यावर पसरवा आणि कापून घ्या.वरून शेंगदाण्याचे जाडसर कूट घाला.

My Tip:

तुम्ही मिश्रणात आले मिरची कुटून टाकू शकता.

Reviews for Farali Dhokla Recipe in Marathi (0)