मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे

Photo of Paneer Makhana stuffed Upwas Appe by archana chaudhari at BetterButter
848
2
0.0(0)
0

उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे

Aug-05-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे कृती बद्दल

आतील सारणामुळे हे उपवासाचे अप्पे खूपच छान लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर ४ टेबलस्पून किसून घेतलेले
  2. मखाणा २ टेबलस्पून भाजून चुरून घेतलेले
  3. दूध २ कप
  4. साखर ३ टेबलस्पून
  5. वेलची पूड १ चिमूटभर
  6. बटाटा ३/४ कप उकडून किसून घेतलेला
  7. आरारूट २ टेबलस्पून
  8. तेल २ टीस्पून

सूचना

  1. सारणासाठी- दूध उकळायला ठेवा.
  2. दूध उकळल्यावर त्यात पनीर, चुरून घेतलेला मखाणा टाका.
  3. साखर, वेलची पूड टाका.
  4. मिश्रण मध्ये मध्ये हलवत रहा.
  5. मिश्रण पूर्णपणे घट्ट होऊ द्या.
  6. एका भांड्यात सारण काढा.
  7. बटाट्याच्या उकडलेल्या किसामध्ये आरारूट टाकून गोळा बनवून घ्या.
  8. सारण आणि गोळा तयार आहे.
  9. आता बटाट्याच्या गोळ्यांचे लहान लहान सारखे गोळे बनवून घ्या.
  10. एक गोळा घेऊन प्लास्टिकच्या कागदावर त्या गोळ्याची छोटीशी पुरीसारखे बनवून त्यात वरील सारण भरा.
  11. गोळा व्यवस्थित बंद करून घ्या.
  12. याप्रमाणे सगळे गोळे बनवून घ्या.
  13. अप्पेपात्रात थोडेसे तेल टाकून वरील सारण भरलेले गोळे ठेवा.
  14. दोन्ही बाजुंनी छान शेकून घ्या.
  15. पनीर मखाणा भरलेले अप्पे तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर