उपवासाचा बटाटा रोल | Potato Staffing Roll Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato Staffing Roll recipe in Marathi,उपवासाचा बटाटा रोल, Bharti Kharote
उपवासाचा बटाटा रोलby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    40

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

उपवासाचा बटाटा रोल recipe

उपवासाचा बटाटा रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Staffing Roll Recipe in Marathi )

  • कव्हर बनवण्यासाठी
  • रूचिराचे शिंगाडा पीठ
  • दीड चमचा लाल तिखट
  • पाव चमचा आल खिसून
  • पाव चमचा जीरे पूड
  • एक चमचा गरम तेलाचे मोहन
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • स्टफींग साठी
  • मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे दोन
  • 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • पाव चमचा जीरे
  • दोन चमचे कोथिंबीर
  • दोन चमचे ओले खोबरे खिसून
  • दोन चमचे तळलेले शेंगदाणे
  • एक टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

उपवासाचा बटाटा रोल | How to make Potato Staffing Roll Recipe in Marathi

  1. ऊकडलेले बटाटे कुस्करून घेतले. ..
  2. कढाई गॅस वर ठेवून थोडे तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या घालून बटाटे घातले. .
  3. त्यात मीठ खोबरे खीस कोथिंबीर घालून चांगल मिक्स करून परतून घेतले.
  4. तळलेले शेंगदाणे घालून मिक्स करून घेतले. .
  5. त्याचे रोल बनवले. ..
  6. आता एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेऊन लाल तिखट मीठ आल जीरे पूड घातली. ..
  7. तेलाचे मोहन आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार केले. ..
  8. गॅस वर कढाईत तेल तापत ठेवले. ..
  9. बॅटर मध्ये बटाटा रोल बुडवून तेलात सोडले. .
  10. तेलात डीप फ्राय करून घेतले. .
  11. छान खरपूस तळले. .
  12. झणझणीत खोबरे चटणी सोबत सर्व्ह केले. .

My Tip:

असेच रताळी चे रोल बनवता येतात. .

Reviews for Potato Staffing Roll Recipe in Marathi (0)