आंबटगोड लिंबाचे लोणचे | Limbache Lonche Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Limbache Lonche recipe in Marathi,आंबटगोड लिंबाचे लोणचे, Archana Lokhande
आंबटगोड लिंबाचे लोणचेby Archana Lokhande
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

आंबटगोड लिंबाचे लोणचे recipe

आंबटगोड लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Limbache Lonche Recipe in Marathi )

  • लिंबू ६
  • साखर १ १/२ वाटी
  • मीठ १ चमचा
  • लाल तिखट २-३ चमचे

आंबटगोड लिंबाचे लोणचे | How to make Limbache Lonche Recipe in Marathi

  1. सर्व लिंबू धुवून पुसून स्वच्छ कोरडे करून घेतले.
  2. लिंबाच्या फोडी करून घेतल्या.
  3. नंतर लिंबाच्या फोडी मिक्सरवर वाटून घेतले.
  4. आता एक काचेची स्वच्छ आणि कोरडी बरणी घेऊन त्यात वाटलेला लिंबू मोजून घातला.
  5. त्यातच साखर,मीठ आणि तिखट घालून छान मिक्स करून बरणी बंद करून एक दिवस ठेवून दिले.
  6. दुसऱ्या दिवशी सर्व पुन्हा मिक्स करून घ्यावे.
  7. आणि आंबटगोड तिखट असे लोणचे तयार.

My Tip:

एक वाटी लिंबास दीड ते दोन वाटी साखर वापरावी.लोणचे आंबट वाटल्यास आणखी थोडी साखर घालावी.

Reviews for Limbache Lonche Recipe in Marathi (0)