Photo of Arbi kabab by Renu Chandratre at BetterButter
604
4
0.0(0)
0

अरबी कबाब

Aug-08-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अरबी कबाब कृती बद्दल

नेहमी च्या उपवासाचे पदार्थां ऐवजी , काही तरी वेगळ आणि रुचकर करून बघा, अरवी चे मस्स्त कबाब, पार्टी साठी स्टार्टर म्हणून पण सर्व्ह करू शकता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. अरबी / अरवी/ अळू ७-१०
  2. राजगिरा पीठ १-२ मोठे चमचे
  3. लाल तिखट चवीनुसार
  4. दाण्या च कूट १-२ मोठे चमचे
  5. आले - हिरवी मिरची ची पेस्ट १-२ लहान चमचे
  6. आमसूल पावडर १/२-१ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जीरे १ चमचा
  9. शेंग दाणे तेल किंवा तूप गरजेनुसार शेलो फ्राय करायसाठी

सूचना

  1. अळू उकडून , जरा गार झाले की सोलून घ्या आणि हलक्या हाताने जरा दाबून घ्यावे
  2. राजगिरा पीठ, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, जीरे ,आले हिरवी मिरची पेस्ट ,आमसूल पावडर सर्व व्यवस्थित मिक्स करावे
  3. दाबलेले अळू या मिश्रणात , व्यवस्थित दाबून घोळवून घ्यावे
  4. नॉन स्टिक तव्या वर तेल किंवा तूप गरम करून त्यावर अळू मंद आचेवर शेलो फ्राय करावे
  5. दोनी बाजूने कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
  6. हिरव्या चटणी सोबत लगेच गरमा गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर