उपवासाची बटाटा भाजी | Pharali Potato Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pharali Potato Bhaji recipe in Marathi,उपवासाची बटाटा भाजी, Sujata Hande-Parab
उपवासाची बटाटा भाजीby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

उपवासाची बटाटा भाजी recipe

उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Potato Bhaji Recipe in Marathi )

  • बटाटे (उकडलेले ,सालेकडून छोट्या तुकड्यात कापलेले ) – २ मध्यम 
  • जिरे - १टीस्पून 
  • भाजलेले शेंगदाणे भरड काडून घेतलेले - ३टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्याची जाड पेस्ट - १-२ टेबलस्पून 
  • काजू तुकडे केलेले - १ टेबलस्पून
  • किसलेले ओले खोबरे - १/४ कप
  • मनुका - १ टीस्पून
  • लिंबाचा रस - १टीस्पून
  • ताजी आल्याची पेस्ट - २ टीस्पून
  • मीठ - चवीनुसार  
  • तेल - १ टेबलस्पून

उपवासाची बटाटा भाजी | How to make Pharali Potato Bhaji Recipe in Marathi

  1. एका नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून घ्या. जिरे घाला आणि तडतडू द्या.
  2. आता हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आल्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
  3. उकडून कापलेले बटाटे, भाजलेले शेंगदाणे भरड, काजूचे तुकडे, मनुका, मीठ, ताजे किसलेले खोबरे आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  4. गरमागरम सर्व्ह करा.

Reviews for Pharali Potato Bhaji Recipe in Marathi (0)