उपवासाची करंज्या | Karngi Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Karngi recipe in Marathi,उपवासाची करंज्या, seema Nadkarni
उपवासाची करंज्याby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

उपवासाची करंज्या recipe

उपवासाची करंज्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karngi Recipe in Marathi )

  • 1 1/2 कप राजगिय्याचे पीठ
  • 2-3 चमचा तूप
  • 1/2 कप पीठी साखर
  • 1/4 कप खोबऱ्याचे कीस
  • 1/4 कप शेंगदाण्याचा कुट
  • 1 चमचा काजू ची पावडर
  • 1/2 चमचा बदाम ची पावडर
  • 1 चमचा मनूका
  • 1/4 टि स्पून वेलची पूड
  • तळण्यासाठी तेल किंवा तुप

उपवासाची करंज्या | How to make Karngi Recipe in Marathi

  1. एका भांड्यात राजगिय्याचे पीठ घेऊन त्यात तूपाचे मोहन घालून घट्ट कणिक मळून घ्या.
  2. एका बाउल मध्ये खोबऱ्याचे कीस, शेंगदाण्याचे कूट, काजू-बदाम ची पावडर व पीठी साखर एकत्र करून सारण तयार करावे.
  3. त्यात वेलची पावडर घालून घ्या. कणीक चे छोटी छोटी गोळे करून त्याची पुरी तयार करून त्यात वरील सारण भरून करंजी चा आकार तयार करावा
  4. तेल किंवा तुपात ह्या करंजी तळून घ्यावे.. तयार आहे कूरकुरीत उपवासाची करंजी..

Reviews for Karngi Recipe in Marathi (0)