मुख्यपृष्ठ / पाककृती / असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स

Photo of Assorted Sweet Potato Balls by Sujata Hande-Parab at BetterButter
490
4
0.0(0)
0

असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स कृती बद्दल

रताळी हि उपवासाला अतिशय उत्तम पर्याय आहे. उकडलेली रताळी खाऊन कंटाळा येत असेल तर ह्या प्रकारचे बॉल्स जरूर करून पाहावेत. करण्यास सोपे आणि अतिशय स्वादिष्ट लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिजवलेले आणि मॅश केलेली रताळी - २ वाटी
  2. साबुदाणा पीठ - १ - २ टेबलस्पून
  3. लिंबाचा रस - १ टीस्पून
  4. साखर - १/४ वाटी
  5. जिरेपूड - १ टीस्पून
  6. ताजे किसलेले खोबरे - १/२ वाटी + ४ टेबलस्पून सारणासाठी 
  7. पांढरे तीळ - 1/4 वाटी  
  8. खसखस - 2 टीस्पून
  9. भाजलेले आणि भरड केलेला सुकामेवा (बदाम, काजू आणि मनुका) - २ टेबलस्पून
  10. वेलची पूड - १/२ टीस्पून
  11. पिठी साखर किंवा खजूर सिरप - १ टीस्पून
  12. तूप किंवा तेल - तळणीसाठी २ कप  
  13. स्वादानुसार मीठ किंवा सैंधव मीठ
  14. सर्विंगसाठी - गोड दही

सूचना

  1. एका वाडग्यात कुस्करलेले रताळे घेऊन त्यात सैंधव मीठ, साखर, लिंबू रस, साबुदाणा पीठ, भाजलेली जिरा पूड घालून घट्ट मळून घ्यावे.
  2. १ सारण - एका पॅन मध्ये भाजलेले नसतील तर सफेद तीळ, खसखस, आणि किसलेले खोबरे घालावे. थोडे मंद आचेवर सुकेच भाजून घ्यावे. जास्त भाजू नये. त्यात साखर, जायफळ, वेलची पूड घालून १०-१२ सेकंड ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे.
  3. २ सारण - एकदम बारीक केलेले किंवा जाडसर वाटलेले सुका मेवा घ्यावे. पिठी साखर किंवा खजूर सिरप आणि थोडे खोबरे घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
  4. बॉल बनवण्यासाठी - रताळ्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करून त्याला डिस्क किंवा बशी सारखा आकार देऊन त्यात केलेले पहिले सारण भरून घ्यावे. कडा व्यवस्तिथ बंद करून बॉल गोल करून घ्यावा.
  5. असा प्रकारे दुसरे सारण भरून देखील बॉल्स बनवून घ्यावेत. सगळे बॉल्स टाळण्यासाठी तयार करून ठेवावेत.
  6. एका कढईत तेल गरम करून घ्यावे. आच मंद माध्यम ठेवावी नाहीतर बॉल्स टाकल्यावर लगेचच करपण्याची शक्यता असते.
  7. बॉल्स थोडे थोडे करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्यावेत.
  8. गोड दह्या बरोबर गरमा गरम सर्व्ह करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर