मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी मठरी

Photo of Pharali Mathri by Sujata Hande-Parab at BetterButter
912
5
0.0(0)
0

फराळी मठरी

Aug-15-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी मठरी कृती बद्दल

महाराष्ट्रा मध्ये शिंगाडा किंवा शिंगाड्याचे पीठ, वरी हे मोठ्या प्रमाणावर उपासाच्या दिवशी खाल्ले जातात. मी शिंगाडा पीठ, वरीचे पीठ आणि वाटलेली वरी घालून हे मठरीज बनवललेल्या आहेत. वाटलेली वरी एकदम बारीक रव्याचे काम करून मठरीजना एक कुरकुरीत चव देते. पीठ लाटताना जास्तच तुटत असल्यास त्यात वरीचे पीठ घालावे आणि पुन्हा मळावे. जाडसर मोठी चपाती किंवा पराठा करून कटर ने कापून फोर्क चमच्याने टोचे करून मगच फ्राय करावीत.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिंगाडा पीठ – ३/४ - १ कप
  2. वरीचे पीठ किंवा बाणयार्ड मिलेट पीठ - १/२ कप •
  3. वरी तांदूळ - १ टेबलस्पून मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेले  •
  4. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार •
  5. साखर - १/४ टीस्पून
  6. जिरा पूड - १ टीस्पून
  7. काळीमिरी पूड - १ टीस्पून
  8. तूप - १ टेबलस्पून
  9. तेल – २ कप - फ्रयिंग 
  10. पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ कप किंवा गरजेनुसार 
  11. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी

सूचना

  1. एका वाडग्यात सगळ्या सांगितलेल्या वस्तू (पाणी, तेल सोडून)आणि कोमट तूप टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. पीठ ब्रेड क्रम्ब सारखे दिसले पाहिजे.
  2. पाणी हळूहळू घाला आणि थोडे घट्ट पीठ मळून घ्या.
  3. थोडा वेळ 10-15 मिनिटे झाकून ठेवा. कणिक किंवा मळलेले पीठ समान गोळ्यात विभागून घ्या.
  4. प्लास्टिक रॅप किंवा मलमलच्या कपड्याला तेल लावून मोठी थोडी जाडसर चपाती लाटून घ्या. लाटताना लागत असल्यास थोडेसे वरीचे पीठ लावून लाटा.
  5. ३ इंच कटर च्या साहाय्याने छोटे छोटे जाडसर गोल आकारात कापून घ्या. फोर्क च्या मदतीने सगळीकडे टोचून घ्या.
  6. सगळ्या मठरीज असा प्रकारे बनवून ठेवा.
  7. एका कढईमधे तेल गरम करून तयार केलेल्या मठरीज मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आच मंदच ठेवा नाहीतर मठरीज आतून कच्च्या आणि बाहेरून करपतील.
  8. टिशु पेपर वर काढून घ्या.
  9. गरमा गरम चहा किंवा खोबरे-शेंगदाणा चटणी बरोबर सर्व्ह करा.
  10. हवाबंद डब्यात भरून ५-६ दिवस चांगले राहतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर