फराळी केळ्याचे घारगे | Farali banana Gharge Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  15th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Farali banana Gharge recipe in Marathi,फराळी केळ्याचे घारगे, Sujata Hande-Parab
फराळी केळ्याचे घारगेby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    25

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

फराळी केळ्याचे घारगे recipe

फराळी केळ्याचे घारगे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali banana Gharge Recipe in Marathi )

  • वरी तांदूळ पीठ – 1 कप
  • पिकलेले केळे –1/2 सोलून मॅश केलेले (सगळे एकदम घालू नये)
  • मीठ किंवा सैंधव मीठ – १/४ टीस्पून
  • किसलेला गुळ किंवा साखर – १-२ टेबलस्पून (केळ्याच्या गोडीनुसार कमी जास्त करा)
  • तेल - १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप फ्रयिंग
  • पाणी पीठ मळण्यासाठी - गरजेनुसार लागत असेल तरच वापरावे. (पर्यायी)
  • सर्विंग साठी - फ्रेश खोबरे चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी , चहा

फराळी केळ्याचे घारगे | How to make Farali banana Gharge Recipe in Marathi

  1. परातीत किंवा बाउल मध्ये वरी तांदूळ पीठ घ्या.
  2. त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
  3. त्यामध्ये किसलेला गुळ, मीठ, पिकलेले मॅश केलेले केळे घालून मिश्रण एकजीव करून घ्या. लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले (लागत असेल तरच)आणि घट्ट पीठ मळून घ्या.२०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  4. नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  5. पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून घारगे लाटून घ्या. जर पीठ चिकट लागत असेल तर पोळपाटाला आणि गोळ्यांना पीठ लावून घारगे लाटून घ्या. किंवा एक मोठी मध्यम जाड पोळी लाटून ३ इंच कटर ने छोटे छोटे घारगे कापून घ्यावेत
  6. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेले घारगे व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  7. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा चहा बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

My Tip:

केळे थोडे थोडे घालावे,एकदम घातल्यास पीठ चिकट होण्याची शक्यता असते.जर लागत असेल तर वरीचे पीठ ऍड करून कणिक तिंबून घ्यावी.

Reviews for Farali banana Gharge Recipe in Marathi (0)