मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी कबाब

Photo of Farali Kabab by Aarti Nijapkar at BetterButter
789
3
0.0(0)
0

फराळी कबाब

Aug-19-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी कबाब कृती बद्दल

फराळी कबाब हा खास उपवासासाठी बनविलेला आहे उपवासाला नेमकी चटपटीत झणझणीत वेगळे असे खावेसे वाटते तर हा उत्तम पर्याय आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वाफवलेले कच्ची केळी ४
  2. उकडलेला बटाटा १
  3. राजगिऱ्याचं पीठ १/२ कप
  4. भाजलेले शेंगदाणे ४ मोठे चमचे
  5. जिरे १ लहान चमचा
  6. कोथिंबीर चिरलेली १ चमचा (हवीअसेलतर)
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी
  9. स्कीवर्स ८ ते १०
  10. चटणी
  11. कोथिंबीर १ वाटी
  12. हिरव्या मिरच्या २ ते ३
  13. भाजके शेंगदाणे २ मोठे चमचे
  14. साखर १ लहान चमचा
  15. मीठ चवीनुसार
  16. लिंबाचा रस १ लहान चमचा

सूचना

  1. प्रथम एक खोलगट भांड घ्या त्यात किसलेले केळी , बटाटा , राजगिरा पीठ , भाजलेले शेंगदाणे , हिरवी मिरची , जिरे , चवीनुसार मीठ , घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  2. हाताला थोडंस तेल लावून घ्या स्कीवर्स भोवती मिश्रण वळून घ्या वळून एका ताटात ठेवून द्या
  3. खोलगट कढईत तेल तापवून मग मंद आचेवर थोडं लालसर होईपर्यंत तळून घ्या
  4. तळलेले कबाब किचन पेपर वर काढून घ्या अश्याप्रकारे फराळी कबाब तयार
  5. फराळी कबाब दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा
  6. चटणी करिता मिक्सर च्या जार मध्ये सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर