Photo of Fasting ghevar by Aarti Nijapkar at BetterButter
1196
7
0.0(2)
0

Fasting ghevar

Aug-19-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • व्हिस्कीन्ग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तूप १/३ वाटी
  2. बर्फाचे खडे ३ ते ४
  3. शिंगाडा पीठ १/२ वाटी
  4. वरीचे पीठ १/२ वाटी
  5. तूप किंवा तेल घेवर तळण्यासाठी
  6. साखर १ वाटी
  7. पाणी १ वाटी
  8. वेलची पूड १/२ चमचा
  9. केसर सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम एका वाडग्यात तूप घेऊन त्यात बर्फाचे खडे घालून चोळून घ्या
  2. तूप व्यवस्थित घट्ट होइपर्यंत बर्फाचे खडे तुपात फिरवत राहा
  3. छानसं तूप घट्ट झाले की उरलेले बर्फाचे खडे काढून घ्या
  4. तुपाचा रंग पांढरा झाला पाहिजे
  5. आता ह्यात शिंगाडा व वरीचे पीठ घाला त्यात हळू हळू गार पाणी ओतत ढवळत राहा गुठळ्या राहू देऊ नये मिश्रण तयार करा
  6. एका उभट टोपात तूप तापवून घ्या गरम झाले की आच मध्यम करून त्यात मिश्रण लहान चमच्याने थोडं थोडं घालत जा मधोमध सूरीने मिश्रण बाजूला करा जेणेकरून मध्ये गोल खड्डा होईल
  7. भुरकट रंग होइपर्यंत तळायचे आहे छानशी जाळी तयार होऊ द्या
  8. झाले की एका जाळीवर काडून घ्या अश्याप्रकारे सर्व घेवर बनवून घ्या
  9. साखरेचा पाक बनवून त्यात वेलची पूड घालून घ्या आणि घेवर वर पाक घाला त्यावर केसर घालून मस्त खा
  10. साखरेचा पाक एक तार असावा
  11. हवं असल्यास रबडी सोबत खाऊ शकता
  12. मस्त उपवासाचे फराळी घेवर तयार आहेत

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-20-2018
tejswini dhopte   Aug-20-2018

Sharwari Vyavhare
Aug-20-2018
Sharwari Vyavhare   Aug-20-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर