मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची बर्फी

Photo of Sweet Potato Barfi by Aarti Nijapkar at BetterButter
2381
3
0.0(0)
0

रताळ्याची बर्फी

Aug-19-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची बर्फी कृती बद्दल

रताळ्याची बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वाफवलेले रताळे ४ ते ५
  2. ओले खोबरे किसलेले १/३ वाटी
  3. तूप १ मोठा चमचा
  4. दुधाची पावडर २ मोठे चमचे
  5. गूळ १/४ वाटी किंवा गोडीनुसार
  6. वेलची पूड १/२ लहान चमचा
  7. बदाम पिस्ता केसर सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम वाफवलेले रताळे सोला व किसून घ्या ओले खोबरं किसून घ्या
  2. गॅस वर पॅन किंवा कढई गरम करा त्यात तूप घाला किसलेले रताळे व खोबरे एकत्र करून मंद आचेवर परतवून घ्या
  3. खरपूस भाजले की त्यात दुधाची पावडर घाला व एकत्र करून घ्या
  4. आता गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या गूळ वितळले की आच मंद करा व सतत परतत रहा जेणेकरून गूळ जळणार नाही
  5. मिश्रण छानसं एकजीव झाले की त्यात वेलची पूड घाला व एकत्र करून गॅस बंद करा
  6. आता एका ताटाला तूप लावून घ्या व मिश्रण ताटात घालून पसरवून घ्या त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून घ्या व मिश्रण थंड होऊ द्या
  7. थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात सुरीने कापून घ्या
  8. बदाम पिस्ता केसर ने सजावट करा
  9. आणि मस्त रताळ्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या
  10. रताळ्याची वडी/ बर्फी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर