रवा नारऴ लाडू | Rava coconut ladoo Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rava coconut ladoo recipe in Marathi,रवा नारऴ लाडू, Teju Auti
रवा नारऴ लाडूby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

9

0

रवा नारऴ लाडू recipe

रवा नारऴ लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava coconut ladoo Recipe in Marathi )

  • २ कप बारीक रवा
  • १ कप खवलेला ताजा नारळ
  • दिड कप साखर
  • १ कप पाणी
  • ४ टेस्पून तूप
  • १/२ टिस्पून वेलची पूड
  • 4.2 टेबल स्पून — बारीक चिरलेले बदाम व मनुका

रवा नारऴ लाडू | How to make Rava coconut ladoo Recipe in Marathi

  1. कढईमध्ये 1 टी स्पून तूप गरम करून त्यात बदाम व मनुका टाकून एक मिनिट परतून बाजूला ठेवावे.
  2. उरलेले तूप गरम करून घ्यावे, त्यात रवा घालून 10–12 मिनिटे किंवा छान वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजावे.
  3. नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे.
  4. साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा.
  5. लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.सुकामेवा घालावा.
  6. मिश्रण आळले कि लाडू बनवावेत.

My Tip:

नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.

Reviews for Rava coconut ladoo Recipe in Marathi (0)