बाजार आमटी | Bajar Aamati Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bajar Aamati recipe in Marathi,बाजार आमटी, Aarya Paradkar
बाजार आमटीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

बाजार आमटी recipe

बाजार आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajar Aamati Recipe in Marathi )

  • ** मिक्स धान्यांचे रवा साहित्य
  • 1/2 वाटी तुर डाळ
  • 1/2 वाटी मुग डाळ
  • 1/2 वाटी उडीद डाळ
  • 1/2 चणा डाळ
  • 3 चमचे तांदूळ
  • 3 चमचे गहू
  • ** मसाला साहित्य
  • 7-8 लवंगा
  • 7-8 मिरे
  • 2 इंच दालचिनी तुकडा
  • 1 चमचा खसखस
  • 1 चमचा जिरे
  • 2 चमचा तिळ
  • 1 चमचा शेंगदाणे
  • 1/2 खिसलेले खोबरे
  • ** फोडणी साहित्य
  • 1/2 हळद
  • पाव चमचा हिंग
  • 2 चमचे आले लसुण पेस्ट
  • 1 चमचा धणे जिरे पावडर
  • 1 चमचा तिखट
  • 2 चमचे कांदा लसूण मसाला
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

बाजार आमटी | How to make Bajar Aamati Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व डाळी व गहू, तांदूळ खमंग भाजून मिक्सरवर रवाळ (भरडलेले )पिठ करुन घ्यावे
  2. नंतर मसाला साहित्य ,लवंग, मिरे, दालचिनी, तिळ, शेंगदाणे, खोबरे ,खसखस व जीरे, खमंग भाजून मिक्सरवर वाटून घ्यावे
  3. 2 तांबे पाणी गरम करण्यास ठेवणे
  4. नंतर एका भांड्यात नेहमी पेक्षा जास्त तेल घालून फोडणी करुन त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  5. फोडणीत तयार केलेला मसाला घालून परतणे व नंतर कांदा लसूण मसाला, तिखट घालून हलवणे
  6. नंतर वरील भरडलेल्या पिठातील 3-4 चमचे पिठ घालून चांगले परतून घ्यावे
  7. उकळलेले पाणी घालून चांगले एकजीव करावे
  8. वर तेलाची तर्री येई पर्यंत खळखळून उकळी आणावी

Reviews for Bajar Aamati Recipe in Marathi (0)