Photo of Taro leaf rolls by SUCHITA WADEKAR at BetterButter
1149
5
0.0(0)
0

आळूवडी

Aug-26-2018
SUCHITA WADEKAR
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळूवडी कृती बद्दल

आळूवडी करून बरेच दिवस नाही तर बरेच महिने झाले होते. सध्या आळूची पाने बाजारात दिसू लागलीत त्यामुळे आळूवडी करण्याची इच्छा झाली. हि आळूवडी सर्वांचीच आवडती, पण ही थोडी तिखटच चांगली लागते. काही ठिकाणी ही आळूवडी लालतिखट घालून केली जाते पण हिरवी मिरची घालून केलेली आळूवडी जास्त टेस्टी लागते. मिरची थोडी जास्त घ्यावी. तिखट आणि आंबटगोड अशी चव आल्याने आळूवडी एकदम भारी लागते. माझी आजी आळूवडी खूप छान बनवायची. आम्ही मुले बऱ्याचदा उकडलेली आळूवडी जाता येता संपवून टाकायचो कारण ती तळेपर्यंत आम्हाला दमच निघत नसे. आता माझी मुलगी हया गोष्टी करते तेव्हा लहानपणीचे दिवस आठवतात. काहीवेळा ही आळूवडी खाल्यावर घशात एक विचित्र खवखव होते, ती होऊ नये यासाठी आळूच्या पानांची निवड काळजीपूर्वक करावी. काही आळूच्या पानांना काळसर आमसुली कलरची कड असते आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे पानांच्या शिराही याच कलरच्या असतात, अशी पाने आळूवडीसाठी वापरावीत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. ● अळूच्या 2 गड्ड्या (10 पाने)
  2. ● बेसनपीठ 2 वाट्या
  3. ● लिंबा एवढी चिंच
  4. ● गुळ लिंबाएवढा
  5. ● हिरव्या मिरच्या 4-5 (तिखट)
  6. ● लसूण पाकळ्या 4-5
  7. ● जिरे 1 चमचा
  8. ● हिंग, हळद प्रत्येकी अर्धा चमचा
  9. ● मीठ आवश्यकतेनुसार

सूचना

  1. 1. प्रथम थोड्याशा पाण्यात चिंच भिजत घालावी.
  2. 2. आळूची पाने स्वच्छ धुऊन पोळपाटावर लाटण्याने लाटून घ्यावीत.
  3. 3. जिरे, लसून, हिरव्या मिरचिचे मिक्सरवर वाटण करून घ्यावे.
  4. 4. चिंच भिजली की तिचा कोळ काढून घ्यावा.
  5. 5. त्यात बारीक केलेला गुळ घालून हिरवी मिरचीचे वाटण घालावे.
  6. 6. हिंग, हळद, मीठ घालून त्या पाण्यात बसेल एवढे बेसनपीठ घालावे.
  7. 7. लाटण्याने लाटून ठेवलेले एक अळूचे पान घेऊन त्याला बेसनपीठाचे तयार केलेले पीठ लावावे.
  8. 8. त्यावर दुसरे पान ठेऊन त्यालाही पीठ लावावे.
  9. 9.अशाप्रकारे 3 ते 4 पाने एकावर एक ठेऊन त्याची वळकटी (रोल) करावी.
  10. 10. आणि तीळ लावून तेल लावलेल्या चाळणीत ठेऊन 20 मिनिटे वाफ द्यावी.
  11. 11. वाफवल्यानंतर त्याच्या एकसारख्या वड्या करून तेलात खरपूस तळून घ्याव्यात.
  12. आपली आळूवडी तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर